India Vs South Africa 2nd T20 Weather Forecast : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील 3 टी-20 सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना पावसामुळे वाहून गेला. पहिला टी-20 सामना एकही चेंडू टाकल्याशिवाय रद्द करावा लागला. त्यानंतर आता या मालिकेतील दुसरा सामना 12 डिसेंबरला होणार आहे. पोर्ट एलिझाबेथ येथील सेंट जॉर्ज पार्क येथे दोन्ही संघ आमनेसामने येतील. पण दुसऱ्या सामन्यातही चाहत्यांची निराशा होईल का? पोर्ट एलिझाबेथमध्येही पाऊस खलनायक बनेल का?
सामन्याच्या दिवशी पोर्ट एलिझाबेथमध्ये पाऊस पडेल का?
हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार चाहत्यांसाठी कोणतीही चांगली बातमी नाही. वास्तविक, डर्बन टी-20 प्रमाणेच पोर्ट एलिझाबेथमध्येही पाऊस खलनायक ठरू शकतो. म्हणजेच पावसामुळे सामना वाहून (रद्द) जाऊ शकतो. संध्याकाळी 5 वाजता पावसाची शक्यता 20 टक्के आहे. याशिवाय आर्द्रता 73.5% अपेक्षित आहे. तर तापमान 24 अंश सेल्सिअस ते 17 अंश सेल्सिअस दरम्यान राहील. तसेच आकाशात दाट ढग (ढगाळ वातावरण) असतील. त्याचवेळी हा सामना स्थानिक वेळेनुसार संध्याकाळी 5 वाजता सुरू होईल. पण चांगली बातमी अशी आहे की, सामन्याच्या मध्यावर दव पडण्याची अजिबात शक्यता नाही.
वेगवान गोलंदाजांना मिळेल खेळपट्टीची मदत…
ढगाळ वातावरण राहणार असल्याने वेगवान गोलंदाजांना खेळपट्टीची मदत मिळेल, असे मानले जात आहे. पण या विकेटवर फिरकीपटूला फारशी मदत मिळण्याची शक्यता नाही. दरम्यान, भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील मालिकेतील दुसरा सामना पोर्ट एलिझाबेथ येथे खेळवला जाणार आहे. हा सामना भारतीय वेळेनुसार रात्री 8.30 वाजता सुरू होईल. यानंतर मालिकेतील तिसरा सामना जोहान्सबर्ग येथे 14 डिसेंबर रोजी खेळवला जाईल.
Taipei Open Indoor World Series(Archery) : महाराष्ट्राच्या प्रथमेश जावकरचा सुवर्णवेध…
दरम्यान, टीम इंडिया येथे दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तीन सामन्यांची टी-20 मालिका खेळणार आहे. यानंतर भारतीय संघ प्रोटीयाविरुद्ध (दक्षिण आफ्रिका) तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका आणि दोन सामन्यांची कसोटी मालिकाही खेळणार आहे. भारतीय कर्णधार रोहित शर्मा टी-20 आणि वनडे मालिकेत अनुपस्थित आहे. अशा परिस्थितीत सूर्यकुमार यादव टी-20 मालिकेत टीम इंडियाचे नेतृत्व करताना दिसणार आहे आणि केएल राहुल वनडे मालिकेचे नेतृत्व करताना दिसणार आहे. रोहित शर्मा कसोटी मालिकेतून मैदानात परतणार आहे. विराट कोहलीही येथे टी-20 आणि एकदिवसीय मालिका खेळत नाही. तो थेट टेस्ट जर्सीमध्येच दिसणार आहे.