चीन, जपानमधून येणाऱ्या रसायनावर भारताने लावले अतिरिक्त शुल्क
Updated On:

नवी दिल्ली – भारत सरकारने चीन आणि जपानमधून येणार्या जलशुद्धीकरण क्षेत्रातील रसायनावर अतिरिक्त शुल्क म्हणजे अँटी डम्पिंग ड्युटी लावली आहे. हे देश भारतामध्ये ही रसायने उत्पादन मूल्यापेक्षा कमी किमतीत निर्यात करीत असल्याचे दिसून आले.
या संदर्भात देशांतील उद्योगांनी वाणिज्य मंत्रालयाकडे तक्रारी केल्या होत्या. या सर्व तक्रारींची चौकशी केल्यानंतर या रसायनावर प्रति टन 986 डॉलर इतके शुल्क लावण्याचा निर्णय घेतला असून या निर्णयाची अंमलबजावणी पुढील पाच वर्षे केली जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.





