Biopharmaceutical Alliance : भारतासह ‘या’ 5 देशांची बायोफार्मास्युटिकल आघाडी स्थापन…

सिंगापूर – बायोफार्मास्युटिकल क्षेत्रात पुरवठा शृंखला तयार करण्यासाठी संयुक्त प्रयत्न करण्यासाठी आघाडी करण्याच्या प्रयत्नांचा भाग म्हणून दक्षिण कोरिया, भारत, अमेरिका, जपान आणि युरोपियन संघ एकत्र आले आहेत. सॅन दिएगो येथे जगातील सर्वात मोठे बायोफार्मास्युटिकल प्रदर्शन बायो इंटरनॅशनल कन्व्हेन्शन-२०२४ भरले आहे. त्यादरम्यान बायोफार्मास्युटिकल अलायन्सची उद्घाटन बैठक झाली.
सहभागी देशांमधील सरकारी अधिकारी तसेच बायो आणि फार्मास्युटिकल कंपन्यांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते, असे दक्षिण कोरियाच्या वृत्तसंस्थेने म्हटले आहे. या बैठकीमध्ये सहभागी झालेल्यांनी विश्वासार्ह आणि शाश्वत पुरवठा साखळीच्या महत्त्वावर भर दिला आणि संबंधित देशांची जैव धोरणे, नियम आणि संशोधन आणि विकास समर्थन उपायांमध्ये समन्वय साधण्याचे मान्य केले.
Israel-Hamas War : गाझातील शाळेवर इस्रायलचा हवाई हल्ला, 30 पॅलेस्टिनी ठार…
तसेच आवश्यक कच्चा माल आणि घटकांचे उत्पादन काही देशांमध्ये केंद्रित आहे. तपशीलवार फार्मास्युटिकल पुरवठा साखळी नकाशा तयार करण्यासाठी एकत्र काम करण्याचे देखील त्यांनी मान्य केले.





