India Pakistan Trade : भारताबरोबरच्या व्यापार स्थगितीमुळे पाकचे 40 अब्ज डॉलरचे नुकसान
भारताबरोबरचा व्यापार स्थगित असल्यामुळे पाकिस्तानचे तब्बल ४० अब्ज डॉलरचे आर्थिक (India Pakistan Trade) नुकसान झाले आहे.

India Pakistan Trade : भारताबरोबरचा व्यापार स्थगित असल्यामुळे पाकिस्तानचे तब्बल ४० अब्ज डॉलरचे आर्थिक (India Pakistan Trade) नुकसान झाले आहे. २०१९ मध्ये झालेल्या पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर वातावरणात तणाव निर्माण झाल्यामुळे भारताने पाकिस्तानबरोबरचे व्यापारी संबंध तोडून टाकले आहे. याचा मोठा आर्थिक फटका पाकिस्तनला सोसावा लागतो आहे.
त्यामुळे दोन्ही देशांनी व्यवसायिक संबंध पुन्हा प्रस्थापित करावेत, असे आवाहन पाक-भारत व्यवसाय (India Pakistan Trade) परिषदेचे अध्यक्ष नूर मुहम्मद कासुरी यांनी केले आहे. दोन्ही देशांनी मिळून गुंतवणूक, पर्यटन आणि प्रादेशिक सहकार्याच्या नवीन संधी निर्माण कराव्यात असे आवाहनही कासुरी यांनी केले आहे.
भारताने व्यवसायिक संबंध तोडल्यामुळे पाकिस्तानला कच्चा माल आणि अन्य उत्पादनांची आयात लांबून करावी लागते. यामुळे मालवाहतूकीचा अतिरिक्त खर्च करावा लागतो आहे. पाकिस्तानचा औषधनिर्माण उद्योग भारतात उपलब्ध असलेल्या कच्च्या मालावर अवलंबून होता. शेजारच्या देशाकडून होणाऱ्या आयातीमुळे दरवर्षी २ अब्ज ते ३ अब्ज अमेरिकन डॉलरची बचत व्हायची.
देशांतर्गत कापूस उत्पादन घटल्यामुळे पाकमधील (India Pakistan Trade) कापड गिरण्यांना ब्राझील, इजिप्त, चीन आणि अमेरिकेतून कापूस आयात करावा लागतो आहे. /मुळे ५ अब्ज डॉलरचा अतिरिक्त भार सोसावा लागतो आहे. साखर, खते, सिमेंट, पेट्रोलियम उत्पादने, लोखंड आणि पोलाद, भाजीपाला आणि अवजड यंत्रसामग्री या क्षेत्रांमध्ये भारताची भरीव उत्पादन क्षमता असूनही, पाकिस्तानला ही उत्पादने दूरच्या बाजारपेठांमधून आयात करावी लागत आहेत.
कृषी उत्पादने भारतातून उपलब्ध झाल्यास पाकिस्तानातील उद्योगांच्या उत्पादन खर्च कमी होऊ शकेल. धार्मिक आणि ऐतिहासिक ठिकाणांना आणि वारसा स्थळांना भेट देण्यासाठी भारतीय पर्यटक पाकिस्तानात येऊ शकतात, असेही कसुरी म्हणाले.






