India – Pak Attack : हारोप आणि हार्पी ड्रोनच्या वापर करून भारताकडून लाहोरमधील हवाई संरक्षण यंत्रणा उद्ध्वस्त

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव शिगेला पोहोचला आहे. बुधवारी मध्यरात्री भारत आणि पाकिस्तान यांच्यात हवाई हल्ले झाले. भारताने पाकिस्तानच्या लाहोरमधील हवाई संरक्षण यंत्रणा उद्ध्वस्त केली. शत्रूराष्ट्र पाकिस्तानला याची जाणीवही झाली नाही.
पाकिस्तानचे हल्ले भारताने हाणून पाडले
भारताने पाकिस्तानचे हवाई हल्ले यशस्वीपणे परतवून लावले. पाकिस्तानी सैन्य आणि हवाई दलाने 15 ठिकाणांवर 30 हून अधिक सरफेस-टू-एअर मिसाइल्स डागली, जी हवेतच निष्क्रिय करण्यात आली.
पाकिस्तानच्या हल्ल्यांचा भारतावर परिणाम नाही
भारतीय हवाई दलाच्या हवाई संरक्षण यंत्रणेने आणि त्याद्वारे तयार केलेल्या संरक्षण कवचामुळे (एअर डिफेन्स अम्ब्रेला) संपूर्ण संरक्षण झाले. पाकिस्तानी सैन्य आणि हवाई दलाने सातत्याने केलेल्या हल्ल्यांचा भारतावर कोणताही परिणाम झाला नाही.
हवाई संरक्षण यंत्रणेद्वारे उद्ध्वस्त
भारतीय हवाई दलाने आकाश MR सॅम आणि इतर हवाई संरक्षण यंत्रणांच्या माध्यमातून हे हल्ले परतवून लावले. भारतीय हवाई दलाने संपूर्ण हवाई संरक्षण कवच तयार केले होते, ज्यामुळे सर्व लष्करी तळ आणि नागरिकांचे संरक्षण झाले.
लाहोरमध्ये हारोप आणि हार्पी ड्रोनचा वापर
यामध्ये पाकिस्तानी ड्रोनचाही समावेश होता, ज्यांची जॅमिंग करण्यात आली. पाकिस्तानला प्रत्युत्तर म्हणून भारतीय हवाई दलाने हारोप आणि हार्पी ड्रोनचा वापर करून लाहोरमधील हवाई संरक्षण यंत्रणा उद्ध्वस्त केली. यानंतर पाकिस्तानात खळबळ उडाली आहे.





