#INDvPAK Semifinal : पाकिस्तानचे भारतासमोर १७३ धावांचे आव्हान

पोटचेफ्स्टूम : कर्णधार रोहेल नजी़र आणि सलामीवीर हैदर अली यांच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर पाकिस्तानने १९ वर्षाखालील विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य लढतीत भारतीय संघासमोर विजयासाठी १७३ धावांचे आव्हान ठेवले आहे.
https://twitter.com/BCCI/status/1224658196964364288?s=19
पाकिस्तानचा कर्णधार रोहेल नजीरने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्विकारली होती. प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानने हैदर अलीच्या ५६(७७), रोहेल नजीरच्या ६२(१०२) आणि मोहम्मद हारिसच्या २१(१५) धावांच्या खेळीच्या जोरावर ४३.१ षटकांत सर्वबाद १७२ अशी मजल मारली. या तिन्ही फलंदाजांशिवाय एकालाही दुहेरी धावसंख्या गाठता आली नाही.
From 95/3 Pakistan fell to 172 all out.
What did you make of that performance with the ball from the Indian team?#U19CWC | #INDvPAK | #FutureStars pic.twitter.com/cWB0YiluUS
— ICC Cricket World Cup (@cricketworldcup) February 4, 2020
भारतीय संघाकडून गोलंदाजीत सुशांत मिश्राने ८.१ षटकांत २८ धावा देत सर्वाधिक ३ गडी बाद केले. कार्तिक त्यागीने ८ षटकांत ३२ धावा देत २, रवि बिश्नोईने १० षटकात ४६ धावा देत २, अथर्वा अन्कोलेकरने ७ षटकांत २९ धावा देत १ आणि यशस्वी जैस्वालने ३ षटकांत ११ धावा देत १ गडी बाद केला.





