संयुक्त राष्ट्र – भारत खूप यशस्वी उदयोन्मुख अर्थव्यवस्था असून कृत्रिम बुद्धिमत्ता शिखर बैठक आयोजित करण्यासाठी हे अगदी योग्य ठिकाण असल्याचे गौरवोद्गार संयुक्त राष्ट्राचे सरचिटणीस ॲन्टोनिओ गुटेरेस यांनी काढले आहेत. जगभरातील दोन महाशक्तींनाच कृत्रिम बुद्धिमत्तेचा फायदा होणे ही गोष्ट पूर्णपणे अमान्य आहे. याचा फायदा केवळ विकसित देशांनाच व्हायला पाहिजे, असे काही नाही. कृत्रिम बुद्धिमत्तेचा सर्व जगाला फायदा व्हायला हवा. कृत्रिम बुद्धिमत्तेचा फायदा सर्वत्र, सर्वांनाच आणि ग्लोबल साऊथमधील सर्व देशांना व्हायला हवा, हे अत्यंत आवश्यक आहे, असेही गुटेरेस म्हणाले. ही शिखर बैठक आयोजित केल्याबद्दल भारताचे मनापासून अभिनंदन देखील त्यांनी केले. उद्यापासून २० फेब्रुवारीपर्यंत नवी दिल्लीत चालणाऱ्या कृत्रिम बुद्धिमत्ता शिखर बैठकीसाठी गुटेरेस भारतात येणार आहेत.