Rahul Gandhi : “भारत आर्थिक संकटाच्या उंबरठ्यावर” – राहुल गांधी
न्यूयॉर्कमधील कोलंबिया विद्यापीठात झालेल्या एका संवादादरम्यान काँग्रेस खासदार आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी भारताच्या आर्थिक भविष्याबाबत चिंता व्यक्त केली आहे.

Rahul Gandhi – भारत सध्या एका आर्थिक संकटाच्या उंबरठ्यावर उभा आहे. देशात प्रचंड बेरोजगारी आहे, उत्पादन क्षेत्र कोलमडले असून शिक्षण व्यवस्थेत खोलवर रुजलेल्या समस्या आहेत. सध्याचा आर्थिक मार्ग असाच सुरूच ठेवल्यास देश गंभीर संकटात सापडू शकतो, असा इशाराही असे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी दिला.
न्यूयॉर्कमधील कोलंबिया विद्यापीठात झालेल्या एका संवादादरम्यान काँग्रेस खासदार आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी भारताच्या आर्थिक भविष्याबाबत चिंता व्यक्त केली आहे.
राहुल गांधी म्हणाले, थोडक्यात सांगायचं तर, भारत आर्थिक संकटाच्या उंबरठ्यावर आहे. हेच सत्य आहे. काहीजण याकडे दुर्लक्ष करू शकतात, माध्यमे याकडे दुर्लक्ष करू शकतात, पण भारतात बेरोजगारी ही एक मोठी समस्या आहे. तसेच देशासमोर बेरोजगारीची मोठी समस्या आहे आणि शिक्षण व्यवस्थेतही गंभीर आव्हाने आहेत, असेही त्यांनी सांगितले.
भारताच्या आर्थिक मॉडेलने जवळपास एका दशकापूर्वीच परिणाम देणे थांबवले आहे. मेक इन इंडिया आणि स्टार्ट-अप इंडिया यासारख्या योजना आर्थिक कणा सावरण्यात अपयशी ठरल्याचा दावा त्यांनी केला. मध्यमवर्गीय कुटुंबांतील सुशिक्षित तरुणांमध्ये ही निराशा विशेषत्वाने दिसून येते.
रोजगाराच्या संधींचा अभाव आणि भविष्याबद्दलची अनिश्चितता ही त्यांच्या वाढत्या असंतोषामागची प्रमुख कारणे आहेत. आम्ही याचा अभ्यास करत आहोत, आम्ही याचा शोध घेत आहोत आणि याचे कारण खूपच रंजक आहे. मुळात त्यांना स्वतःचे भविष्य दिसत नाही, असेही ते म्हणाले.
लघु व मध्यम उद्योग आणि कृषी क्षेत्र हे भारताच्या अर्थव्यवस्थेचा कणा असून रोजगार निर्मितीसाठी ते अत्यंत महत्त्वाचे आहेत. केवळ सेवा क्षेत्राच्या माध्यमातून तुम्ही इतक्या मोठ्या लोकसंख्येला रोजगार देऊ शकत नाही. त्
यामुळे उत्पादन क्षेत्र पुन्हा उभारण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. तसेच, देशात काही मोजके मोठे व्यावसायिक विस्तार करत आहेत, तर दुसरीकडे छोटे व्यावसायिक संघर्ष करत आहेत, असा आरोपही त्यांनी केला.






