#U19WorldCup #AUSvsIND Final Live Score : ऑस्ट्रेलियाला पाचवा धक्का, सौम्य पांडेने ‘हरजस सिंग’ला धाडलं माघारी…

U19 World Cup AUS vs IND Final Live Score : रविवारी (11 फेब्रुवारी) अंडर-19 विश्वचषकाच्या अंतिम फेरीत भारताचा सामना ऑस्ट्रेलियाशी होत आहे. दोन्ही संघ तिसऱ्यांदा विजेतेपदाच्या लढतीत आमनेसामने येत आहेत. भारताने याआधी 2012 आणि 2018 च्या फायनलमध्ये त्यांना पराभूत केले होते. टीम इंडियाने आतापर्यंत पाच वेळा हे विजेतेपद पटकावले आहे. त्याचबरोबर ऑस्ट्रेलिया तीन वेळा चॅम्पियन बनला आहे. ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
IND vs AUS U19 Live Score : हरजस सिंग अर्धशतक झळकावून परतला पॅव्हेलियनमध्ये..
ऑस्ट्रेलियाकडून खेळणारा भारतीय वंशाचा फलंदाज हरजस सिंग अर्धशतक झळकावून पॅव्हेलियनमध्ये परतला. त्याने अंडर-19 विश्वचषकातील पहिले आंतरराष्ट्रीय अर्धशतक 50 चेंडूत झळकावले. हरजसला सौम्य पांडेने बाद केले. 38 षटकांचा खेळ पूर्ण झाला असून ऑस्ट्रेलियाची धावसंख्या 5 बाद 182 इतकी झाली आहे. सध्या राफे मॅकमिलन सातव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आला आहे.
ऑस्ट्रेलियाला चौथा धक्का..
त्याआधी ऑस्ट्रेलियाच्या डावातील 35व्या षटकातील पहिल्या चेंडूवर राज लिंबानीने रायन हिक्सला बाद करत भारताला चौथे यश मिळवून दिले. 20 धावा करून यष्टिरक्षक फलंदाज रायन हिक्स बाद झाला. हरजस सिंग आणि हिक्स यांच्यात चौथ्या विकेटसाठी 66 धावांची भागीदारी झाली. सहाव्या क्रमांकावर ऑलिव्हर पीक फलंदाजीला आला आहे.
ऑस्ट्रेलियाने टाॅस जिंकला…
अंडर-19 विश्वचषकात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. भारतीय संघ प्रथम गोलंदाजी करेल. कांगारू संघाला कमी धावसंख्येवर रोखण्याचा भारताचा प्रयत्न असेल.
🚨 Toss Update 🚨
Australia have elected to bat in the #U19WorldCup Final.
Follow the match ▶️ https://t.co/RytU4cGJLu#TeamIndia | #BoysInBlue | #INDvAUS pic.twitter.com/8qSttXgLus
— BCCI (@BCCI) February 11, 2024
IND vs AUS U19 Live Score : दोन्ही संघ खालीलप्रमाणे..
भारत : उदय सहारन (कर्णधार), अर्शिन कुलकर्णी, आदर्श सिंह, रुद्र मयूर पटेल, सचिन धास, प्रियांशु मोलिया, मुशीर खान, अरावली अवनीश राव, सौम्य पांडे, मुरुगन अभिषेक, इनेश महाजन, धनुष गौड़ा, आराध्या शुक्ला, राज लिंबानी, नमन तिवारी
ऑस्ट्रेलिया : ह्यू वेबगेन (कर्णधार), लाचलान ऐटकेन, चार्ली एंडरसन, हरकीरत बाजवा, महली बियर्डमैन, टॉम कैंपबेल, हैरी डिक्सन, रेयान हिक्स, सैम कोनस्टास, राफेल मैकमिलन, ऐडन ओकोनोर, हरजस सिंह, टॉम स्ट्रेकर, कैलम विडलर ,ओली पीक.





