Bird Flu : बर्ड फ्लूपासून मिळणार दिलासा; देशातील पहिल्या स्वदेशी H5N1 लसीचे अनावरण
Bird Flu : देशातील पोल्ट्री व्यावसायिक आणि कुक्कुटपालन करणाऱ्या लाखो शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत दिलासादायक आणि ऐतिहासिक बातमी समोर आली आहे.

Bird Flu : देशातील पोल्ट्री व्यावसायिक आणि कुक्कुटपालन करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. बर्ड फ्लू अर्थात H5N1 विषाणूपासून कोंबड्यांचे संरक्षण करण्यासाठी भारताने पहिली स्वदेशी लस विकसित केली आहे. (Bird Flu)
भोपाळ येथील आयसीएआर-राष्ट्रीय उच्च सुरक्षा पशुरोग संस्थेने ही लस विकसीत केली आहे. या लसीचे केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी आज राष्ट्रार्पण केले. (Bird Flu)
याबाबत केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाने अधिकृत माहिती दिली आहे. या लसीचे वैशिष्ट्य म्हणजे ती H5N1 च्या क्लेड 2.3.2.1A या विषाणू प्रकाराविरोधात विकसित करण्यात आली आहे. ही निष्क्रिय लस असून, भारतात या विशिष्ट विषाणू प्रकाराविरोधात विकसित झालेली पहिली स्वदेशी लस असल्याचे मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. (Bird Flu)
HPAI म्हणजेच हायली पॅथोजेनिक एव्हियन इन्फ्लुएंझा या आजाराला सामान्यतः बर्ड फ्लू म्हणून ओळखले जाते. हा पक्ष्यांना होणारा अत्यंत गंभीर संसर्गजन्य आजार आहे. या आजाराचा प्रादुर्भाव झाल्यास मोठ्या प्रमाणात पक्ष्यांचा मृत्यू होऊ शकतो. (Bird Flu)
संसर्ग रोखण्यासाठी अनेकदा बाधित पक्ष्यांना नष्ट करावे लागते. तसेच व्यापारावर निर्बंध येत असल्याने पोल्ट्री व्यावसायिकांना मोठ्या आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागते. २००६ मध्ये भारतात पहिल्यांदा बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव आढळला होता. त्यानंतर देशात H5N1 आणि H5N8 या विषाणू प्रकारांचे मिळून ५०० हून अधिक प्रादुर्भाव नोंदवण्यात आले आहेत. (Bird Flu)
केंद्र सरकारच्या माहितीनुसार, बर्ड फ्लूचा मोठा उद्रेक झाल्यास भारताच्या जीडीपी वाढीवर १.५ टक्क्यांपर्यंत परिणाम होऊ शकतो. हा आजार नियंत्रणाबाहेर गेल्यास देशातील २० टक्क्यांहून अधिक पोल्ट्री पक्ष्यांना संसर्गाचा धोका निर्माण होऊ शकतो. (Bird Flu)
२००६ मधील बर्ड फ्लूच्या प्रादुर्भावामुळे भारताला प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष स्वरूपात अंदाजे २,२०० ते ३,००० कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. मणिपूरमध्ये झालेल्या एका प्रादुर्भावामुळे राज्याच्या जीडीपीच्या सुमारे ०.५ टक्क्यांइतके आर्थिक नुकसान झाल्याचेही समोर आले होते. (Bird Flu)




