SAFF U17 C’ship 2024 : उपांत्य फेरीसाठी आधीच पात्र, भारताचा मालदीववर दणदणीत विजय….

SAFF U17 Championship 2024 (India vs Maldives) : – दुसऱ्या सत्रात बदली खेळाडू म्हणून आलेल्या हेमनिचुंग लँकिमने केलेल्या दोन गोलांच्या जोरावर भारताने सैफ 17 वर्षांखालील गटात मालदीवचा 3-0 असा पराभव करताना स्पर्धेतील विजयी घोडदौड कायम राखली. भारताच्या सॅमसन अहोंगशांगबामने 14 व्या मिनिटाला गोल करताना संघाला आघाडी मिळवून दिली.
Hemneichung Lunkim nets two as India beat Maldives in SAFF U17 Championship! 🇮🇳🔥
Read match report 👉🏻 https://t.co/TE02O8YXE1#IndianFootball pic.twitter.com/GB2P9XcbBP
— Indian Football Team (@IndianFootball) September 24, 2024
त्यानंतर दोन्ही संघांना पहिल्या सत्रात गोल करता आला नाही. दुसऱ्या सत्रात बदली खेळाडू म्हणून आलेल्या हेमनिचुंग लँकिमने 74 व्या व 89 व्या मिनिटाला गोल करून संघाची आघाडी 3-0 अशी निर्णायक आघाडी घेतली. या विजयासह भारत ‘अ’ गटात सहा गुणांसह अव्वल स्थानी आहे. यापूर्वीच्या लढतीत भारताने बांगलादेश संघाला पराभूत केले होते.
Indian Super League 2024-25 : मोहन बागानकडून नॉर्थईस्ट पराभूत….
बांगलादेश संघानेही मालदीवपेक्षा चांगल्या गोल फरकाच्या जोरावर उपांत्य फेरी गाठण्यात यश मिळविले. आता 28 सप्टेंबरला पहिल्या उपांत्य फेरीत भारताचा सामना ब गटातील उपविजेत्या (भूतान, पाकिस्तान किंवा नेपाळ)शी होईल.





