भारत-चीन तणाव : ‘पंतप्रधानजी, देश तुमच्यासोबत, पण काहीतरी बोला’

मुंबई – चिनी लष्करासोबत निर्माण झालेल्या तणावाला हिंसक वळण लागले असून संघर्षात भारतीय लष्कराचा एक अधिकारी आणि 20 जवान शहीद झाले आहेत. यावरून आता विरोधकांनी मोदी सरकारवर प्रश्नांची तोफ डागली आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे.
संजय राऊत म्हणाले कि, चीनच्या कारवाईला आपण चोख प्रत्युत्तर कधी देणार आहात? एकही गोळी न चालवता चीनने आपले २० जवान शहीद झाले आहेत. आपण नेमके काय केले? चीनचे किती जवान मारले गेले? चीनने आपल्या भूमीत घुसखोरी केलीये का? पंतप्रधान मोदीजी, या संघर्षाच्या काळात देश तुमच्या पाठीशी आहे, मात्र खरं नेमकं आहे तरी काय?? देशाला सत्य जाणून घ्यायचंय तुम्ही काहीतरी बोला, अशी विनंतीही त्यांनी केली आहे.
प्रधान मंत्री जी आप शुर और योद्धा हो..आपके नेतृत्त्वमे
देश चीन से बदला लेंगा..— Sanjay Raut (@rautsanjay61) June 17, 2020
तसेच पंतप्रधान मोदीजी आपण शूरवीर आणि योद्धे आहात. आपल्या नेतृत्वात भारत चीनचा बदला घेईन असा विश्वास व्यक्त करत तोपर्यंत काल आणि परवा भारत-चीन सीमेवर काय झाले ते सांगा, असेही त्यांनी म्हंटले आहे.
दरम्यान, पूर्व लडाखमधील संघर्षानंतर संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी उच्चस्तरीय बैठका घेतल्या. राजनाथ यांनी बोलावलेल्या दोन बैठकांना संरक्षण दल प्रमुख बिपीन रावत यांच्याबरोबरच लष्कर, नौदल आणि हवाई दलाचे प्रमुख उपस्थित राहिले. त्याशिवाय, परराष्ट्रमंत्री एस.जयशंकरही त्या बैठकांमध्ये सहभागी झाले. त्या बैठकांमध्ये पूर्व लडाखमधील स्थितीचा आढावा घेण्यात आला आहे.





