Seyyed Abbas Araqchi : पश्चिम आशियातील सुरू असलेल्या संकटाच्या पार्श्वभूमीवर इराणचे परराष्ट्र मंत्री सय्यद अब्बास अराघची यांनी एक मोठं विधान केलं आहे. शुक्रवारी, १५ मे रोजी ब्रिक्स परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत “या प्रदेशातील शांततेच्या मार्गातील मुख्य अडथळा अमेरिकाच आहे. हे युद्ध थांबवण्यासाठी भारत महत्त्वाची भूमिका बजावू शकतो.” असं मोठं विधान केलं. अमेरिकेवर साधला निशाणा (Seyed Abbas Araqchi ) “आता, ४० दिवसांच्या लढाईनंतर, जेव्हा अमेरिकेने इराणवरील आक्रमणात कोणतेही उद्दिष्ट साध्य करण्याची आशा सोडली आहे, तेव्हा त्यांनी वाटाघाटींचा प्रस्ताव दिला आहे. आमचा अमेरिकनांवर अजिबात विश्वास नाही. कोणत्याही राजनैतिक प्रयत्नांमधील हाच मुख्य अडथळा आहे. आमच्याकडे अमेरिकनांवर विश्वास न ठेवण्याची सर्व कारणे आहेत, तर त्यांच्याकडे आमच्यावर विश्वास न ठेवण्याचे कोणतेही कारण नाही.” अशा शब्दांत अराघची यांनी अमेरिकेवर जोरदार निशाणा साधला. भारताविषयी नेमकं काय म्हणाले अराघची? (Seyed Abbas Araqchi) Seyed Abbas Araqchi : ‘भारत मोठी भूमिका बजावू शकतो’; इराणच्या विदेशी मंत्र्याचं वक्तव्य चर्चेत ते पुढे म्हणाले, “माझा विश्वास आहे की, भारत आपल्या चांगल्या प्रतिष्ठेमुळे या प्रदेशात राजनैतिक संबंध सुलभ करण्यात आणि शांतता व सुरक्षेला चालना देण्यात महत्त्वाची भूमिका बजावू शकतो. भारत पर्शियन आखातातील सर्व देशांचा मित्र आहे. या प्रदेशात भारताने बजावलेल्या कोणत्याही सकारात्मक आणि रचनात्मक भूमिकेचे आम्ही कौतुक करतो.” होर्मुझच्या सामुद्रधुनीबद्दल अराघची म्हणाले… इराण होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जाणाऱ्या सर्व जहाजांना मदत करण्यास तयार आहे. परंतु, सध्याची परिस्थिती खूप गुंतागुंतीची आहे. तेहरानशी युद्ध करणाऱ्या देशांची जहाजे वगळता, होर्मुझची सामुद्रधुनी जगभरातील जहाजांसाठी खुली राहील, असे त्यांनी स्पष्ट केलं आहे. चाबहार बंदरासाठी भारताची प्रशंसा चाबहार बंदर हे इराण आणि भारत यांच्यातील सहकार्याच्या प्रतीकांपैकी एक आहे. असे म्हणत “त्या बंदराच्या विकासात भारतीयांनी महत्त्वाची भूमिका बजावली याचा आम्हाला खूप आनंद आहे. अमेरिकेच्या निर्बंधांमुळे आता कामाचा वेग काहीसा मंदावला आहे. पण मला खात्री आहे की, हे बंदर भारतासाठी एक सुवर्णद्वार ठरेल. या वाहतूक मार्गाद्वारे मध्य आशिया, कॉकेशस आणि त्यानंतर युरोपमध्ये प्रवेश मिळेल, तसेच युरोपियन, मध्य आशियाई आणि इतरांना हिंद महासागरातही प्रवेश मिळेल.” असे म्हणत त्यांनी भारताची प्रशंसा केली. दिलासादायक निर्णयाची अपेक्षा इराण-इस्राइल युद्धाच्या सावटामुळे अनेक भारतीय एलपीजी टँकर अजूनही इराणमधून जाण्यासाठी इराणच्या परवानगीची वाट पाहत आहेत आणि भारत या मुद्द्यावर तेहरानसोबत राजनैतिक चर्चा करत आहे. इराणकडून दिलासादायक निर्णयाच्या प्रतिक्षेत भारत आहे. हेही वाचा : Eye glasses: चष्म्याची चुकीची काळजी पडते महागात! या सवयींमुळे लेन्स लवकर होतात खराब