India U19 Final : अफगाणिस्तानचा धुव्वा उडवत भारताची फायनलमध्ये धडक! १४ नोव्हेंबरला रंगणार भारत-पाक महामुकाबला; बदला घेण्याची मोठी संधी
India beat Afghanistan U19 Semifinal: भारताने १९ वर्षांखालील आशिया कप २०२६ च्या उपांत्य फेरीत अफगाणिस्तानला पराभूत केले. आता हा संघ अंतिम सामन्यात पाकिस्तानचा सामना करेल.

India Beats Afghanistan Reaches U19 Asia Cup Final Against Pakistan Lakshya Aryaveer Fifty : भारतीय अंडर-१९ क्रिकेट संघाने अष्टपैलू आणि दमदार कामगिरीच्या जोरावर एसीसी अंडर-१९ आशिया चषकाच्या अंतिम फेरीत दिमाखात प्रवेश केला आहे. उपांत्य सामन्यात कर्णधार लक्ष्य राजेश रायचंदानीच्या नेतृत्वाखाली भारताने अफगाणिस्तानचा तब्बल ८ गडी राखून धुव्वा उडवला. या विजयासह भारताने सलग दुसऱ्यांदा आशिया चषकाच्या अंतिम सामन्याचे तिकीट पक्के केले आहे. दुसऱ्या उपांत्य सामन्यात पाकिस्तानने बांगलादेशचा ९ गडी राखून पराभव केल्याने, आता येत्या १४ नोव्हेंबर रोजी भारत आणि पाकिस्तान यांच्यात जेतेपदासाठी हायव्होल्टेज महामुकाबला रंगणार आहे.
भारतीय गोलंदाजांचा भेदक मारा; अफगाणिस्तान २२७ धावांत गारद
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा अफगाणिस्तानचा निर्णय भारतीय गोलंदाजांनी पूर्णपणे फोल ठरवला. भारताच्या अचूक आणि शिस्तबद्ध माऱ्यासमोर अफगाण फलंदाजांना मोकळेपणाने धावा करता आल्या नाहीत. त्यांचा डाव ५० षटकांत ८ बाद २२७ धावांवर रोखला गेला. भारताकडून वेगवान गोलंदाज इशान सूदने सर्वाधिक ४३ धावांत ३ विकेट्स घेत प्रतिस्पर्ध्यांचे कंबरडे मोडले; या कामगिरीसह त्याने स्पर्धेत एकूण ११ विकेट्स घेतल्या आहेत.
कर्णधार लक्ष्य रायचंदानी आणि आर्यवीर सेहवागची शतकी सलामी –
India cruise past Afghanistan with a commanding performance to book their place in the final 🇮🇳
A blockbuster rematch against Pakistan awaits in the #DPWorldMensU19AsiaCup2026 final, just like last year. We can’t wait 🤩
#ACC https://t.co/CFFpmkZhsc
— AsianCricketCouncil (@ACCMedia1) November 12, 2026
प्रत्युत्तरात २२८ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय सलामीवीरांनी वादळी सुरुवात केली. कर्णधार लक्ष्य रायचंदानी आणि वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीर सेहवाग यांनी अफगाण गोलंदाजांची धुलाई करत पहिल्या विकेटसाठी शतकी भागीदारी रचली. आर्यवीरने ५७ चेंडूंत ४ चौकार आणि ४ षटकारांसह ५१ धावांची आक्रमक अर्धशतकी खेळी केली.
लक्ष्यचे शतक अवघ्या ७ धावांनी हुकले; ३७ व्या षटकात विजयावर शिक्कामोर्तब
ANOTHER HALF-CENTURY FOR AARYAVIR SEHWAG! 👏
Aaryavir brings up another impressive fifty but departs immediately after, scoring 51.
#AaryavirSehwag #AsiaCupU19 https://t.co/Y8n1KY49Ou
— OneCricket (@OneCricketApp) November 12, 2026
आर्यवीर बाद झाल्यानंतर कर्णधार लक्ष्य रायचंदानीने एक बाजू लावून धरत भारताला १५० धावांच्या पार नेले. तो शतकाच्या अगदी उंबरठ्यावर असताना सोहेल खानने त्याला ९३ धावांवर बाद केले; या खेळीत लक्ष्यने १३ चौकार आणि १ षटकार लगावला. त्यानंतर व्ही. के. विनीतने नाबाद अर्धशतक झळकावत यशवर्धनच्या साथीने ३७ व्या षटकात भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.
मागील फायनलच्या पराभवाचा हिशोब चुकता करण्याची सुवर्णसंधी –
Captain Lakshya Raichandani is the Player of the Match for his 93(90) in the chase 🫡
India U19 enter the Final with a convincing 8️⃣-wicket victory 👏
Scorecard ▶️ https://t.co/mssnDLDhTk
#MensU19AsiaCup https://t.co/beI3GFvtE8
— BCCI (@BCCI) November 12, 2026
आता १४ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या अंतिम सामन्यात भारतासमोर पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानचे आव्हान असेल. मागील आशिया चषक फायनलमध्ये पाकिस्तानकडून झालेल्या पराभवाचा वचपा काढण्याची आणि विजेतेपदावर नाव कोरण्याची मोठी सुवर्णसंधी युवा टीम इंडियाकडे चालून आली आहे.





