Princess Cup volleyball : भारताची मलेशियावर मात
Updated On:

नवी दिल्ली – प्रिन्सेस करंडक व्हॉलिबॉल स्पर्धेत साखळीतील तिसऱ्या सामन्यात भारतीय महिला संघाने मलेशियाचा पराभव करत आगेकूच केली. थायलंडमध्ये सुरु असलेल्या स्पर्धेतील या सामन्यात अनुश्री, शौर्या शोन यांनी केलेल्या अफलातून कामगिरीच्या जोरावर भारताने मलेशियावर 25-17, 15-16, 25-22 अशी मात केली.
शनिवारपासून सुरु झालेल्या या स्पर्धेचा अंतिम सामना येत्या शुक्रवारी होणार असून त्यात भारतीय संघाला स्थान मिळवण्यासाठी साखळी सामन्यांतील पुढील लढत जिंकावी लागणार आहे. या सामन्यात भारतीय संघाने अविश्वसनिय कामगिरी करत विजयाची नोंद केली.


