IND vs AUS : रोहितचा शतकी धमाका, कोहलीचा अर्धशतकी झंजावात; भारताचा ऑस्ट्रेलियावर दणदणीत विजय!

IND vs AU India beat Australia by 9 wickets : रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्या दमदार फलंदाजीच्या जोरावर भारताने तिसऱ्या वनडेत ऑस्ट्रेलियाचा 9 गडी राखून पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने 46.4 षटकांत सर्वबाद 236 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात भारताने रोहित शर्माच्या शतकी (121) आणि विराट कोहलीच्या अर्धशतकी (74) खेळीच्या जोरावर 38.3 षटकांत 1 बाद 237 धावा करत सामना जिंकला. या दोघांमध्ये दुसऱ्या गड्यासाठी 168 धावांची शानदार भागीदारी झाली, ज्यामुळे भारताने ऑस्ट्रेलियावर एकहाती विजय मिळवला. मात्र, ऑस्ट्रेलियाने तीन सामन्यांची ही मालिका 2-1 ने जिंकली.
रोहितचे शतक, विराटचे अर्धशतक –
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या सामन्यात भारतीय कर्णधार रोहित शर्माने 121 धावांची शानदार शतकी खेळी केली. त्याने 105 चेंडूंचा सामना करत आपले शतक पूर्ण केले. रोहितच्या या खणखणीत खेळीच्या जोरावर भारताने हा सामना सहज जिंकला. याशिवाय, मागील दोन सामन्यांत शून्यावर बाद झालेल्या विराट कोहलीने या सामन्यात नाबाद 74 धावांची दमदार अर्धशतकी खेळी केली. त्याने 56 चेंडूंत आपले अर्धशतक पूर्ण केले. दुसरीकडे, कर्णधार शुबमन गिलने 26 चेंडूंत 24 धावा केल्या.
बहुत ट्रोल होने के बाद आज दोनों भाई वापसी कर गए। दो भाई दोनों तबाही ।#INDvsAUS #ViratKohli #RohitSharma #AUSvIND pic.twitter.com/v73eDHJBLN
— Babalu Yadav (@BabaluY45787126) October 25, 2025
हर्षित राणाचा भेदक मारा –
— BCCI (@BCCI) October 25, 2025
या सामन्यात भारतीय गोलंदाजांनी उत्कृष्ट कामगिरी केली. विशेषतः हर्षित राणाने ऑस्ट्रेलियन फलंदाजांना चांगलेच हैराण केले. त्याने 8.4 षटकांत 39 धावांत चार विकेट्स घेतले. हर्षित व्यतिरिक्त वॉशिंग्टन सुंदरने दोन विकेट्स घेतल्या, तर मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, अक्षर पटेल आणि प्रसिध कृष्णा यांना प्रत्येकी एक विकेट्स घेतली.
हेही वाचा – IND vs AUS : किंग कोहलीने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास! इयान बॉथमचा मोडला सर्वात मोठा विक्रम
ऑस्ट्रेलियाची दोन्ही विभागात निराशाजनक कामगिरी –
या सामन्यात ऑस्ट्रेलियाची फलंदाजी फारशी प्रभावी ठरली नाही. प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियन संघ 236 धावांवर सर्वबाद झाला. त्यांच्याकडून फक्त मॅट रेनशॉने 56 धावांची अर्धशतकी खेळी केली. अन्य कोणताही फलंदाज 50 धावांचा टप्पा गाठू शकला नाही. कर्णधार मिशेल मार्शने 41 धावा केल्या, तर मॅथ्यू शॉटने 30, ट्रेव्हिस हेडने 29, अॅलेक्स कॅरीने 24 आणि कूपर कॉलोनीने 23 धावांचे योगदान दिले. यजमान संघाला गोलंदाजीत विशेष प्रभाव पाडता आली नाही. त्यांच्या गोलंगदाजांनी विराट-रोहितसमोर गुडघे टेकले.





