दहशतवादाविरुद्ध आसियान देशांची एकजूट: दिल्लीत बैठक, भारत-मलेशियाची रणनीती!

नवी दिल्ली – आसियान देशातील संरक्षण मंत्र्यांची दहशतवादविरोधी तज्ञ कार्यगटाची १४ वी बैठक १९ ते २० मार्च दरम्यान नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आली. लाओ पीडीआर, मलेशिया, इंडोनेशिया, म्यानमार, सिंगापूर, थायलंड, मलेशिया, फिलीपिन्स आणि व्हिएतनाम या आसियान देशांबरोबर तसेच चीन, अमेरिका, रशिया, ऑस्ट्रेलिया, जपान आणि कोरिया प्रजासत्ताक/ रिपब्लिक ऑफ कोरिया या एडीएमएम-प्लस सदस्य देशांचे प्रतिनिधींनी या बैठकीत भाग घेतला.
या बैठकीदरम्यान, भारत आणि मलेशियाच्या सह-अध्यक्षांनी २०२४-२७ या कालावधीच्या नियोजित उपक्रमांसाठी कार्य-योजना सादर केली. २०२६ मध्ये मलेशियामध्ये तज्ज्ञ गटासाठी टेबल-टॉप चर्चा/विचार विनिमय आणि २०२७ मध्ये भारतात फील्ड प्रशिक्षण सत्र आयोजित करण्याची घोषणा त्यांनी केली. सहभागी देशांच्या प्रतिनिधी मंडळांच्या प्रमुखांनी आणि आसियान सचिवालयानेही या प्रदेशात दहशतवादाचा मुकाबला करण्यासाठी सर्वोत्तम पद्धतींचा अवलंब करण्याबाबत आपले विचार मांडले.
उद्घाटन सत्रात, संरक्षण सचिव राजेश कुमार सिंह यांनी बीज भाषण दिले आणि उद्घाटन समारंभात सहभागी शिष्टमंडळांच्या प्रमुखांशी संवाद साधला. त्यांनी सांगितले की दहशतवाद हे एक झपाट्याने वाढणारे आव्हान आहे आणि त्याचे धोके सीमा ओलांडून वाढत आहेत. २०२२ मध्ये संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या दहशतवाद विरोधी समितीच्या अध्यक्षपदाच्या काळात दिल्ली घोषणापत्र स्वीकारण्यासह, या प्रदेशातील दहशतवादाचा मुकाबला करण्यासाठी भारताच्या प्रयत्नांवर त्यांनी प्रकाश टाकला.
दोन दिवसांच्या या बैठकीत, दहशतवाद आणि उग्रवादाच्या वाढत्या धोक्याला तोंड देण्यासाठी एक मजबूत आणि व्यापक रणनीती विकसित करण्यावर लक्ष केंद्रित करण्यासाठी चर्चा करण्यात आली. यापूर्वी, २०२१ -२०२४ या वर्षांसाठी या तज्ज्ञ गटाचे सह-अध्यक्ष असलेले म्यानमार आणि रशिया यांनी सध्याच्या कालावधीसाठी (२०२४ – २०२७) भारत आणि मलेशियाला सह-अध्यक्षपद सोपवले . भारताने चालू वर्षासाठी पहिली ईडब्ल्यूजी बैठक आहे.





