मोठी घडामोड ! इंडिया आघाडीतून ‘आम आदमी पक्ष’ बाहेर ; संजय सिंह यांनी सांगितले कारण, वाचा सविस्तर

India Alliance । आम आदमी पक्षाने (आप) विरोधी पक्षांच्या आघाडी इंडिया ब्लॉकच्या पुढील महत्त्वाच्या बैठकीपासून स्वतःला दूर ठेवले आहे. पक्षाने या बैठकीत सहभागी होणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. पक्षाने इंडिया अलायन्सपासून स्वतःला दूर केले आहे. आम आदमी पक्षाचे (आप) खासदार संजय सिंह यांनी स्पष्ट केले आहे की त्यांचा पक्ष इंडिया ब्लॉकमधून बाहेर पडला आहे.
संजय सिंह काय म्हणाले? India Alliance ।
एका हिंदी वृत्तवाहिनीशी बोलताना संजय सिंह यांनी,”इंडिया ब्लॉक लोकसभा निवडणुकीसाठी होता. लोकसभा निवडणुकीनंतर आम्ही हरियाणा आणि दिल्ली विधानसभा निवडणुका एकट्याने लढवल्या. याशिवाय, आम्ही पंजाब आणि गुजरातमधील पोटनिवडणुकाही एकट्याने लढवल्या. ‘आप’ आता इंडिया ब्लॉकचा भाग नाही. आमचा पक्ष आणि अरविंद केजरीवाल यांनी स्पष्ट केले आहे की आम्ही इंडिया ब्लॉकमधून बाहेर आहोत.” असे म्हणत आघाडीतून त्यांचा पक्ष बाहेर पडला असल्याची घोषणा केली.
संसदेतील रणनीतीबद्दल बोलताना संजय सिंह यांनी, “संसदीय मुद्द्यांवर आम्ही तृणमूल काँग्रेस, द्रमुक सारख्या विरोधी पक्षांचा पाठिंबा घेतो आणि ते आमचाही पाठिंबा घेतात.” असेही त्यांनी सांगितले.
भाजपवर एक टीका India Alliance ।
संजय सिंह यांनी आप नेत्यांविरुद्ध अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) चौकशीवर भाजपवर हल्लाबोल केला. याविषयी बोलताना, “भाजप हा भित्र्या लोकांचा पक्ष आहे. ते फक्त आमच्याविरुद्ध एजन्सींचा वापर करू शकतात. आम्ही झुकणार नाही.”असे त्यांनी म्हटले केले. त्यासोबतच रॉबर्ट वाड्रा यांच्या मुद्द्यावर संजय सिंह यांनी,”गेल्या १० वर्षांपासून भाजप ‘जिजाजी’ असा जयघोष करत आहे. जर इतक्या वर्षात ते कोणत्याही निष्कर्षावर पोहोचले नसतील तर ते त्यांचे अपयश आहे.”असे त्यांनी म्हटले.


