India Alliance – विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीचे नेतृत्व कोणी करावे यासंदर्भात चर्चा सुरू असताना कॉंग्रेसचे माजी नेते आणि माजी केंद्रीय मंत्री मणिशंकर अय्यर यांनी मोठा दावा केला आहे. मणिशंकर अय्यर म्हणाले, काँग्रेसने इंडिया आघाडीचे नेतृत्व करण्याचा विचार करू नये असे त्यांनी एका इंग्रजी माध्यमाला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे.
इतर कोणताही पक्ष इंडिया आघाडीचे नेतृत्व करू शकतो का, असे विचारले असता. अय्यर म्हणाले, हा प्रश्न योग्य आहे असे मला वाटत नाही. मला वाटते काँग्रेसने या आघाडीचा नेता बनू नये. ज्याला नेता व्हायचे आहे, त्याला नेता होऊ द्या. ममता बॅनर्जी यांच्याकडे क्षमता आहे… आघाडीतील इतर लोकांमध्येही क्षमता आहे.
कोण नेता बनतो याची मला पर्वा नाही कारण मला वाटते की काँग्रेस पक्ष आणि काँग्रेस नेत्याचे स्थान नेहमीच महत्त्वाचे असते. ते फक्त एकच असण्याची गरज नाही. आघाडीच्या अध्यक्षांपेक्षा राहुल यांना अधिक आदर दिला जाईल याची मला खात्री आहे. लोकसभा निवडणुकीत महाआघाडीची रणनीती प्रभावी ठरली आणि सत्ताधारी भाजप बहुमताचा आकडा गाठू शकला नाही.
तथापि, ज्या भागात इंडिया आघाडीतीतल दोन प्रमुख पक्ष अगोदर प्रतिस्पर्धी राहीले आहेत त्या भागांत आघाडी करणे कठिण असल्याचे सिध्द झाले आहे. भारतीय जनता पार्टीनेही यावर टीका केली होती व ही संधीसाधू आघाडी असल्याचा आरोप केला होता.
दरम्यान, महाराष्ट्रा विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर लगेचच तृणमूल काँग्रेसच्या नेत्या आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी कॉंग्रेस पक्षाला लक्ष्य केले आहे. सगळ्यांनाच सोबत घेऊन पुढे जाण्याची गरज असल्याची टिप्पणी त्यांनी केली आहे. विरोधी भारतीय जनता पार्टीचे सरकार असलेल्या केंद्राविरोधात पाउले उचलत आहेत असे त्या म्हणाल्या होत्या.