Prasidh Krishna : भारतीय संघाला मोठा धक्का! ‘या’ खेळाडूच्या डोक्याला झाली गंभीर दुखापत

सामन्याच्या दुसऱ्या दिवशी भारत ‘ए’च्या डावात ३९व्या षटकात ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज हेनरी थॉर्नटनच्या चेंडूने प्रसिद्ध यांच्या हेल्मेटवर जोरदार आघात केला. सामन्याच्या प्रोटोकॉलनुसार, भारतीय संघाच्या वैद्यकीय पथकाने तातडीने त्यांची कन्कशन चाचणी केली. कर्नाटकच्या या २९ वर्षीय गोलंदाजाने चाचणीनंतर काही काळ फलंदाजी सुरू ठेवली, परंतु तीन षटकांनंतर त्याला मैदान सोडावे लागले.
त्यामुळे प्रसिध आणि बी. साई सुदर्शन यांच्यातील आठव्या गडीसाठीची महत्त्वपूर्ण भागीदारी संपुष्टात आली. प्रसिधच्या जागी विदर्भाचा वेगवान गोलंदाज यश ठाकुर ला कन्कशन सबस्टिट्यूट म्हणून मैदानात उतरवण्यात आले.
हेही वाचा – IND vs BAN : बांगलादेशने जिंकली नाणेफेक! भारताला फलंदाजीचे आमंत्रण, पाहा दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन
भारतीय संघातील एका सूत्राने पीटीआयला सांगितले, “प्रसिध सध्या स्थिर दिसत आहे. आम्ही त्याच्यावर सतत लक्ष ठेवून आहोत आणि उद्या याबाबत अंतिम निर्णय घेतला जाईल.” ऑस्ट्रेलिया ‘ए’च्या पहिल्या डावात प्रसिद्ध याने १७ षटकांत ७६ धावा देत फक्त एकच विकेट्स (सकामी फलंदाज कॅम्पबेल केलावे) घेतली होती.
हेही वाचा – IND U19 vs AUS U19 : भारत अंडर-19 संघाचा धमाकेदार विजय, ऑस्ट्रेलियाला धूळ चारत मालिकेत घेतली अभेद्य आघाडी
या दुखापतीमुळे प्रसिधच्या वेस्टइंडीजविरुद्धच्या कसोटी मालिकेतील सहभागाबाबत अनिश्चितता निर्माण झाली आहे. बीसीसीआय आणि संघ व्यवस्थापन लवकरच याबाबत निर्णय घेण्याची शक्यता आहे.





