India A Final : टीम इंडिया अफगाणिस्तानचा धुव्वा उडवत फायनलमध्ये दाखल! अंतिम सामन्यात ‘या’ संघासोबत भिडणार
India A Final : अत्यंत अटीतटीच्या सामन्यात भारतीय संघाने अफगाणिस्तान 'अ' संघाचा १०१ धावांनी दणदणीत पराभव केला आहे. या मोठ्या विजयासह भारताचे गुणतालिकेत ४ गुण झाले असून, संघाने थेट अव्वल स्थान पटकावले आहे.

India A enter final after beat Afghanistan A by 101 Runs Tri Series Points : श्रीलंकेत सुरू असलेल्या तिरंगी ‘अ’ एकदिवसीय क्रिकेट मालिकेत भारत ‘अ’ संघाने शानदार पुनरागमन केले आहे. अत्यंत अटीतटीच्या सामन्यात भारतीय संघाने अफगाणिस्तान ‘अ’ संघाचा १०१ धावांनी दणदणीत पराभव केला आहे. या मोठ्या विजयासह भारताचे गुणतालिकेत ४ गुण झाले असून, संघाने थेट अव्वल स्थान पटकावले आहे. या विजयामुळे भारताचे अंतिम फेरीत पोहोचणे निश्चित झाले आहे. मात्र, फायनलमध्ये भारताचा सामना कोणाशी होणार, याचा फैसला १९ जून रोजी होणाऱ्या श्रीलंका आणि अफगाणिस्तान यांच्यातील सामन्याच्या निकालावर अवलंबून असेल.
भारताने उभारला ३१९ धावांचा डोंगर; अफगाणचा डाव २१८ वर आटोपला –
या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना ‘भारत-अ’ संघाने ५० षटकांत ९ बाद ३१९ धावांचा विशाल धावसंख्या उभारली होती. ३२० धावांच्या मोठ्या आव्हानाचा पाठलाग करताना अफगाणिस्तानचा संघ २५ व्या षटकापर्यंत सामन्यात टिकून होता. मात्र, त्यानंतर भारतीय गोलंदाजांनी पुनरागमन करत अफगाणिस्तानचे लागोपाठ विकेट्स घेतले. अखेर अफगाणिस्तानचा संपूर्ण संघ ३६.५ षटकांत अवघ्या २१८ धावांवर गारद झाला.
गुणतालिकेत भारत नंबर-१, नेट रनरेटमध्ये मोठी झेप –
भारताने या मालिकेत ४ पैकी २ सामने जिंकले असून २ सामन्यात पराभव पत्करावा लागला आहे. ४ गुणांसह भारताचा नेट रनरेट आता थेट +०.७९७ वर पोहोचला आहे. दुसऱ्या स्थानावरील यजमान श्रीलंकेचे ३ सामन्यांत ४ गुण असून त्यांचा रनरेट +०.४९४ आहे.
INTO THE FINALS 👏
India A clinch a magnificent 1️⃣0️⃣1️⃣-run win over Afghanistan A to book their spot in the finals of the #TriNationSeries 💙
Scorecard ▶️ https://t.co/Kg9IWt7M5b#INDAvAFGA pic.twitter.com/kZ6YL4ngod
— BCCI (@BCCI) June 17, 2026
तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या अफगाणिस्तानचे ३ सामन्यांत २ गुण असून त्यांचा रनरेट उणे (-१.९८३) आहे. आता अफगाणिस्तानला फायनल गाठायची असेल, तर १९ जून (शुक्रवार) रोजी होणाऱ्या सामन्यात श्रीलंकेचा केवळ पराभव करून चालणार नाही, तर अतिशय मोठ्या फरकाने विजय मिळवून श्रीलंकेच्या रनरेटला मागे टाकावे लागेल.
वैभव सूर्यवंशीला पुन्हा मिळणार श्रीलंकेविरुद्ध बदला घेण्याची संधी?
सध्याची समीकरणे पाहता भारत आणि श्रीलंका यांच्यातच २१ जून (रविवार) रोजी फायनल होण्याची शक्यता जास्त आहे. असे झाल्यास, काही दिवसांपूर्वी मैदानावर झालेल्या राड्यानंतर भारताचा १५ वर्षीय सलामीवीर वैभव सूर्यवंशी पुन्हा एकदा श्रीलंकेविरुद्ध मैदानात दिसेल. या महामुकाबल्यात त्याच्या फलंदाजीवर सर्वांचे विशेष लक्ष असणार आहे.





