LIVE UPDATES । देश आज 78 वा स्वातंत्र्यदिन साजरा करत आहे. संपूर्ण देशात उत्साहाचे वातावरण आहे. प्रत्येक ऐतिहासिक आणि महत्त्वाची वास्तू स्वातंत्र्याच्या रंगात रंगल्या आहे
दरम्यान, पंतप्रधान मोदींनी आज त्यांच्या १ १ व्या भाषणात अनेक मुद्यांवर भाष्य करत आहे. PM मोदी आज सकाळी 7.30 वाजता पासून लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित करत आहे.
#WATCH | PM Modi says, “This year and for the past few years, due to natural calamity, our concerns have been mounting. Several people have lost their family members, property in natural calamity; nation too has suffered losses. Today, I express my sympathy to all of them and I… pic.twitter.com/WIkMz4QBbv
— ANI (@ANI) August 15, 2024
LIVE UPDATES । भाषणातील महत्वाचे मुद्दे
– ’40 कोटी भारतीयांनी महासत्तेचा पराभव केला, आज आम्ही 140 कोटी आहोत.’
– आम्ही असंख्य वीरांना सलाम करत आहोत
– ‘नैसर्गिक संकटांनी चिंता वाढवली’
-धोरण आणि हेतू योग्य असतील तर निश्चित परिणाम साध्य होतात
-तरुण, शेतकरी, महिला गुलामगिरीविरुद्ध लढत राहिले
-कोरोनाच्या काळात आम्ही करोडो लोकांना लस दिली
-सैन्याने सर्जिकल स्ट्राईक केल्यावर अभिमान वाटतो
-हा भारताचा सुवर्णकाळ आहे
-नेशन फर्स्टच्या संकल्पाने आम्ही प्रेरित आहोत
-आज देश आकांक्षांनी भरलेला आहे
-शैक्षणिक क्षेत्रात शतकानुशतके जुने नालंदा चेतना जागृत करावे लागेल
-राष्ट्रीय हिताला सर्वोच्च मानून आम्ही सुधारणा केल्या
– जगामध्ये भारताची प्रतिष्ठा वाढली
– 2036 मध्ये भारतात होणाऱ्या ऑलिम्पिकसाठी आम्ही तयारी करत आहोत.
– 5 वर्षात मेडिकलच्या 75 हजार जागा वाढवणार
-देशात धर्मनिरपेक्ष नागरी संहिता असावी
-माझा प्रत्येक क्षण देशासाठी आहे.
-वन नेशन वन इलेक्शन या विषयावर पंतप्रधान मोदी यांनी सविस्तर भाष्य केले
– बांग्लादेशातील हिंदूंच्या सुरक्षिततेची काळजी घेतली पाहिजे. शेजारी राष्ट्रांनी शांततेच्या मार्गावर राहावे अशी भारताची इच्छा आहे.
-काही लोकांना देशाची प्रगती चांगली दिसत नाही
LIVE UPDATES । लाल किल्ल्यावरुन ध्वजारोहण संपन्न
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरुन ध्वजारोहण केलं आहे. आज देशाचा 78 वा स्वातंत्र्य दिवस आहे.
Independence Day 2024: PM Modi arrives at Rajghat, pays tribute to Mahatma Gandhi
Read @ANI Story | https://t.co/GTKiWsxRVA#IndependenceDay2024 #PMModi #Rajghat #RedFort pic.twitter.com/dPyzGGO2RT
— ANI Digital (@ani_digital) August 15, 2024
पंतप्रधान मोदी लाल किल्ल्यावर पोहोचले
पीएम मोदी लाल किल्ल्यावर पोहोचले आहेत. ते येथे गार्ड ऑफ ऑनरची पाहणी करत आहेत. त्यानंतर पंतप्रधान मोदी ध्वजारोहण करतील.
पंतप्रधान मोदींनी महात्मा गांधींना आदरांजली वाहिली
पीएम मोदी राजघाटावर पोहोचले
पीएम मोदी राजघाटावर पोहोचले आहेत. ते येथे महात्मा गांधींना आदरांजली वाहतील. त्यानंतर पंतप्रधान मोदी लाल किल्ल्यावर पोहोचतील. लाल किल्ल्यावरून ते देशाला संबोधित करणार आहेत.
राहुल गांधी लाल किल्ल्यावर पोहोचले
काँग्रेस खासदार आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी लाल किल्ल्यावर पोहोचले आहेत. या सोहळ्यात सहभागी होण्यासाठी केंद्रीय मंत्री आणि जेडीएस नेते कुमारस्वामीही लाल किल्ल्यावर पोहोचले आहेत.
पंतप्रधान मोदींनी शुभेच्छा दिल्या
पंतप्रधान मोदींनी देशवासियांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांनी X वर लिहिले की सर्व देशवासियांना स्वातंत्र्यदिनाच्या खूप खूप शुभेच्छा. जय हिंद.