PM Narendra Modi Speech | देशभरात ७८व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. नुकतेच दिल्लीच्या लाल किल्ल्यावर पंतप्रधानांच्या हस्ते तिरंगा फडकावण्यात आला. त्यानंतर लाल किल्ल्यावरून स्वातंत्र्यदिनानिमित्त ते देशाला संबोधित करणार आहेत. सलग 11 व्यांदा त्यांचे हे भाषण असणार आहे, तर लोकसभा निवडणूकांनंतर त्यांचे हे पहिलंच भाषण असेल. ध्वजारोहणानंतर पीएम मोदींच्या यांच्या भाषणाला सुरूवात झाली असून यावेळी त्यांनी विविध मुद्यांवर भाष्य केले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून केलेल्या त्यांच्या स्वातंत्र्यदिनाच्या भाषणात आजचा हा शुभ मुहूर्त आहे. देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपले जीवन समर्पित करणाऱ्या स्वातंत्र्यप्रेमींना श्रद्धांजली वाहण्यासाठी हा सण आहे, हा देश सदैव त्यांचा ऋणी राहील, असे म्हणत भाषणाला सुरूवात केली. तसेच नैसर्गिक संकटांबाबत चिंता व्यक्त केली.
#WATCH | PM Modi says, “This year and for the past few years, due to natural calamity, our concerns have been mounting. Several people have lost their family members, property in natural calamity; nation too has suffered losses. Today, I express my sympathy to all of them and I… pic.twitter.com/WIkMz4QBbv
— ANI (@ANI) August 15, 2024
ते म्हणाले की, “मागील काही वर्षांपासून नैसर्गिक संकटांमुळे आपल्या सर्वांची चिंता वाढली आहे. नैसर्गिक आपत्तीमध्ये अनेक लोकांनी आपल्या कुटुंबाला गमावले आहे, संपत्ती गमावली. राष्ट्राच्या संपत्तीचे नुकसान झाले. आज मी त्या सर्वांप्रती संवेदना व्यक्त करतो आणि हा विश्वास देतो की हा देश या संकट काळात त्यांच्यासोबत उभा आहे.”
तसेच “एक काळ होता जेव्हा लोक देशासाठी बलिदान देण्यासाठी बांधील होते आणि आपल्याला स्वातंत्र्य मिळालं. आज देशासाठी जगण्यासाठी बांधील होण्याचा हा काळ आहे. आपला हा संकल्प समृद्ध भारत बनवू शकेल,” असा विश्वासही पंतप्रधान मोदींनी व्यक्त केला.
हेही वाचा:
Independence Day LIVE UPDATES । कोरोनाच्या काळात आम्ही करोडो लोकांना लस दिली