Independence Day: स्वातंत्र्यदिन २०२५ : किंग खानने मुलगा अबरामसोबत फडकावला तिरंगा; म्हणाला – “स्वातंत्र्य हेच आपलं सर्वात मोठं वरदान”

Independence Day: काल संपूर्ण देशभरात ७९ वा स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. प्रत्येकाने आपल्या पद्धतीने या राष्ट्रीय सणाचा आनंद लुटला. या जल्लोषात बॉलिवूडही मागे राहिले नाही. अनेक कलाकारांनी सोशल मीडियावरून चाहत्यांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या. त्यामध्ये बॉलिवूडचा किंग शाहरुख खान याचाही सहभाग होता.
शाहरुख खानने आपला लहान मुलगा अबरामसोबत घरी तिरंगा फडकावला. त्याचा फोटो त्यांनी एक्सवर शेअर करत देशवासीयांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या. फोटोमध्ये शाहरुख आणि अबराम तिरंग्याला सॅल्यूट करताना दिसत आहेत.
शाहरुखने या पोस्टसोबत भावनिक संदेश लिहिला आहे. तो म्हणतो,
“आपली आजादी हेच आपलं सर्वात मोठं वरदान आहे, आपल्या प्रगतीची खरी किल्ली आहे. चला, आपण अभिमानाने आपलं मस्तक उंच ठेवूया आणि हृदय सदैव उघडं ठेवूया. सर्वांना स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा… जय हिंद!”
Our Independence is our greatest gift… a key to our progress. Let’s keep our heads held high and hearts open. Happy Independence Day to all of us… Jai Hind! pic.twitter.com/NkCM733xmj
— Shah Rukh Khan (@iamsrk) August 15, 2025
नेटिझन्सच्या शुभेच्छांचा वर्षाव
शाहरुखच्या या पोस्टवर चाहत्यांनीही प्रेमाचा आणि शुभेच्छांचा वर्षाव केला. “स्वातंत्र्य आपला अभिमान आहे, तर एकता आपली खरी ताकद आहे.” अनेकांनी शाहरुखच्या या संदेशाचं कौतुक केलं.
शाहरुखला मिळाला राष्ट्रीय पुरस्कार
अलीकडेच शाहरुख खानला ‘जवान’ या चित्रपटासाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. त्यामुळेही चाहत्यांनी त्याच्या या पोस्टवर त्याचे अभिनंदन केले.
आगामी चित्रपट ‘किंग’
वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं, तर शाहरुखचा पुढील चित्रपट ‘किंग’ आहे. विशेष म्हणजे या चित्रपटातून त्याची मुलगी सुहाना खान मोठ्या पडद्यावर डेब्यू करत आहे. याआधी ती ‘द आर्चीज’ मधून ती ओटीटीवर झळकली होती.





