Independence Day 2025: तिरंग्याचा सन्मान राखा; ध्वजारोहण आणि उतरवण्याचे नियम जाणून घ्या

Independence Day 2025: यावर्षी देशभरात ७९वा स्वातंत्र्य दिन साजरा होत आहे. या दिवशी लाल किल्ल्यासह शाळा, महाविद्यालये, सरकारी कार्यालये येथे ध्वजारोहण केले जाते. “हर घर तिरंगा” या मोहिमेद्वारे प्रत्येक घर आणि सार्वजनिक ठिकाणी तिरंगा लावण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. तिरंगा फडकवताना आणि उतरवताना काही नियम पाळणे बंधनकारक आहे.
* तिरंगा फडकवताना पाळावयाचे नियम:
~ तिरंग्यात मधल्या पांढऱ्या पट्टीवर अशोकचक्र असावे आणि त्यात २४ आरे (स्पोक्स) असावेत.
~ झेंडा स्वच्छ आणि न फाटलेला असावा.
~ झेंडा फडकवताना त्याला पूर्ण सन्मान दिला पाहिजे.
~ मंचावर फडकवत असल्यास, झेंडा वक्त्याच्या उजव्या बाजूला असावा.
~ झेंडा सर्वांना स्पष्ट दिसेल अशा ठिकाणी असावा.
~ इतर कोणताही झेंडा तिरंग्याच्या खाली असावा.
~ तिरंगा जमिनीला लागता कामा नये.
* तिरंगा उतरवताना पाळावयाचे नियम:
~ केशरी आणि हिरव्या पट्ट्या, पांढऱ्या पट्टीखाली दुमडा.
~ पांढरी पट्टी दुमडून अशोकचक्र दिसेल असे ठेवा.
~ दुमडलेला झेंडा हातात घेऊन सुरक्षित ठिकाणी ठेवा.
~ फाटलेला किंवा खराब झालेला झेंडा एकांतात नष्ट करावा.
* भारतीय ध्वज संहितेचे नियम:
~ भारतीय ध्वज संहिता २६ जानेवारी २००२ रोजी लागू झाली.
~ झेंडा आयताकृती असावा, लांबी-रुंदीचे प्रमाण ३:२ असावे.
~ झेंड्यावर काहीही लिहिलेले नसावे.
~ फाटलेला किंवा खराब झेंडा वापरू नये.
या नियमांचे पालन करणे प्रत्येक भारतीयाचे कर्तव्य आहे, कारण तिरंग्याचा सन्मान म्हणजे देशाचा सन्मान.


