‘१० नवीन अणुभट्ट्याचे काम सुरू, शाची अणुशक्ती १० पट…’, लाल किल्ल्यावरून पंतप्रधान मोदींची माहिती
PM speech Independence Day। स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्याच्या तटबंदीवरून देशाला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोठी घोषणा केली आहे. त्यांनी यावेळी “भारत अणुऊर्जेच्या क्षेत्रात मोठी झेप घेणार आहे” असे म्ह्टले. त्यासोबतच त्यांनी,” १० नवीन अणुभट्ट्या बांधण्याचे काम सुरू आहे आणि येणाऱ्या काळात देशाची अणुऊर्जा क्षमता १० पटीने वाढवली जाईल.” अशी मोठी घोषणा देखील केली. तसेच पंतप्रधान मोदी म्हणाले की, “आता या क्षेत्रात खाजगी क्षेत्रासाठीही मार्ग मोकळा झाला आहे.”
‘सेमीकंडक्टर उत्पादनाची कल्पना आली पण…’ PM speech Independence Day।
पंतप्रधान म्हणाले की ,”सेमीकंडक्टर उत्पादनाची कल्पना ५०-६० वर्षांपूर्वी भारतात आली होती, परंतु त्या फायली अडकल्या, लटकल्या आणि भरकटल्या. ‘५० वर्षांपूर्वीची सेमीकंडक्टर फाइल दाबली गेली. पण आता मेड इन इंडिया सेमीकंडक्टर बाजारात येतील. सहा युनिट तयार करण्यात आले आहेत आणि आणखी चार प्लांटना मान्यता देण्यात आली आहे. या वर्षाच्या अखेरीस, भारतात बनवलेल्या आणि भारतातील लोकांनी बनवलेल्या सेमीकंडक्टर चिप्स बाजारात येतील.’
ऊर्जा क्षेत्रावर बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, “आज आपण पेट्रोल, डिझेल आणि गॅससाठी अनेक देशांवर अवलंबून आहोत, ज्यावर लाखो आणि कोटी रुपये खर्च केले जातात. ‘या संकटातून आपल्याला देशाला स्वावलंबी बनवायचे आहे. गेल्या ११ वर्षांत सौरऊर्जेचा वापर ३० पटीने वाढला आहे.”
‘भारताची आता समुद्र मंथनच्या दिशेने वाटचाल ‘
पंतप्रधान म्हणाले की, तंत्रज्ञानाच्या बळावर अनेक देश शिखरावर पोहोचले आहेत आणि भारतही आता ‘समुद्र मंथन’च्या दिशेने वाटचाल करत आहे. ते म्हणाले की, लवकरच राष्ट्रीय खोल पाण्याचे अभियान सुरू होईल, ज्यामध्ये समुद्रात लपलेले वायू आणि तेलाचे साठे शोधले जातील. तसेच, ऑपरेशन गगनयानची तयारी जोरात सुरू आहे आणि अंतराळ क्षेत्रात, भारत स्वतःचे अंतराळ केंद्र बांधण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. पंतप्रधान मोदींनी देशातील तरुणांना, अभियंत्यांना आणि व्यावसायिकांना आवाहन केले की, ‘आपल्याकडे स्वतःचे मेड इन इंडिया फायटर जेट इंजिन असू शकत नाही का? आपल्याकडे असले पाहिजे. लढाऊ विमानांसाठी स्वतःचे इंजिन बनवणे आवश्यक आहे.’
‘प्रत्येक क्षण मौल्यवान ‘ PM speech Independence Day।
पंतप्रधान म्हणाले की, मुद्रा योजनेअंतर्गत लोक कर्ज घेऊन व्यवसाय करत आहेत आणि सरकार उद्योजकतेला प्रोत्साहन देण्यासाठी नियम बदलत आहे. २०४७ हे लक्ष्य असल्याचे वर्णन करताना ते म्हणाले, ‘प्रत्येक क्षण मौल्यवान आहे. आपण एक क्षणही गमावू इच्छित नाही. ही वेळ पुढे जाण्याची, मोठी स्वप्ने पाहण्याची आणि संकल्पासाठी स्वतःला समर्पित करण्याची आहे. जेव्हा सरकार आणि मी तुमच्यासोबत असतो तेव्हा आपण नवीन इतिहास घडवू शकतो.’ पंतप्रधान मोदी म्हणाले की जग आपल्या एमएसएमई क्षेत्राची ताकद ओळखते. ‘आपल्याला जागतिक बाजारपेठेत आपल्या क्षमता सिद्ध कराव्या लागतील आणि गुणवत्तेत सतत नवीन उंची गाठावी लागेल.” असेही त्यांनी यावेळी सांगितले.





