Indapur News : संत तुकोबारायांच्या मानाच्या आश्वाचे गोतोंडी गावात उस्फुर्त स्वागत

इंदापूर : संत श्रेष्ठ तुकाराम महाराज पालखी सोहळ्यासाठी श्री क्षेत्र पंढरपूर वरून क्षेत्र देहू कडे मार्गस्थ झालेल्या पालखी सोहळ्यातील मानाच्या अश्वाचे गोतोंडी येथील माऊली पाटील यांच्या कुटुंबीयांनी हरिनामाच्या गजरात उस्फुर्त स्वागत केले.
संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील मुख्य आश्वाचे स्वागताची परंपरा गोतोंडी गावचे माऊली पाटील यांनी तब्बल 100 वर्षापासून
त्यांच्या पिढ्यांनी जपलेली आहे. अश्व पाटील यांच्या घरी विसाव्यासाठी थांबतो.त्यामुळे परिसरातील वारकरी भक्तगण मोठ्या संख्येने दरवर्षी उपस्थित असतात.
संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील गोल रिंगणामध्ये धावणारा हा अश्व आहे. या आश्वाससोबत पालखी सोहळ्याचे प्रमुख चोपदार ह.भ.प काका महाराज गिराम, वारकरी विणेकरी पताकाधारी तुळशीधारी महिला वारकऱ्यांचे स्वागत हरी नामाचा गजर करत करण्यात आले.
याप्रसंगी ऋषिकेश पाटील, संजय पाटील, स्वप्निगोतोंडी , तुकाराम बिबे, दादा मोरे, कारंडे महाराज, युग येळे तांबिले भाऊसाहेब, मारकड भाऊसाहेब, महिला भगिनी मोठ्या प्रमाणामध्ये उपस्थित होते. यावेळी माऊली पाटील यांचे वतीने महाप्रसाद कार्यक्रम पार पडला.





