इंदापूर : हवामान खात्याच्या अंदाजानुसार इंदापूर शहर व परिसरात मुसळधार पावसाची शक्यता आहे. त्यामुळे शहरातील सर्व नागरिकांनी सतर्क रहावे.असे आवाहन इंदापूर नगर परिषदेचे मुख्य अधिकारी रमेश ढगे यांनी केले आहे. पत्रकारांना माहिती देताना मुख्य अधिकारी रमेश ढगे म्हणाले,शहरातील सार्वजनिक सर्वच नागरिकांना नगरपरिषदेच्या वतीने आम्ही आवाहन केले आहे. मुसळधार पाऊस पडण्याची मोठी शक्यता आहे.त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहून,अनावश्यक बाहेर पडू नये. नाले, ओढा, नदीकाठ व पाणी साचलेल्या ठिकाणी जाणे टाळावे. वीजपुरवठ्याशी संबंधित धोकादायक ठिकाणी जाण्याचे टाळावे. इंदापूर नगरपरिषदेला आवश्यक ती माहिती दयावी व सहकार्य करावे.यासाठी इंदापूर नगरपरिषदेमार्फत आपत्कालीन कक्ष स्थापन करण्यात आला आहे. नागरिकांनी आवश्यकतेनुसार खालील अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा : रश्मी बारस्कर – 7058611816,शिवदत्त भोसले – 9421950958,स्वप्निल शेंडगे – 95112 11700 स्वप्निल हाके 9762723380,व ज्ञानेश्वर तिकांडे – 95032 46402 काही मदत लागल्यास यांना संपर्क साधाव. अशी ही माहिती नगरपरिषदेच्या वतीने देण्यात आली आहे.