Indapur News: ‘भरत शहा मित्र परिवारा’च्या वतीने दहीहंडी महोत्सव; अभिनेत्री ‘मानसी नाईक’ची विशेष उपस्थिती

इंदापूर : इंदापूर शहरात सलग दुसऱ्या वर्षी भरत शहा मित्र परिवाराच्या वतीने भव्य दहीहंडी महोत्सव हजारो गोविंदाच्या उपस्थितीत इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समिती प्रारंगणात गुरुवार (ता.२९ ऑगस्ट) आयोजित केला आहे. यावेळी आमदार रोहित पवार, आमदार संजय जगताप यांच्यासह राजकीय, सामाजिक क्षेत्रातील पुणे जिल्ह्यातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
या संदर्भात माहिती देताना, इंदापूर नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष भरत शहा म्हणाले की, इंदापूर शहरातील दहीहंडी महोत्सवासाठी गोविंदा पथकाची संख्या अधिक आहे. पुणे सोलापूर व इतर जिल्ह्याच्या ठिकाणी इंदापूरच्या दहीहंडी संघाची कामगिरी नेत्रदीपक असते. या गोविंदा संघातील खऱ्या अर्थाने आपल्या शहरात इंदापूरकरांच्या समोर त्यांचा सन्मान व्हावा नवी पिढी, जुनी पिढी अशी ऋणानुबंधाची नाळ अधिक घट्ट व्हावी हाच उद्देश समोर ठेवलेला आहे.
शहरात अनेक वेगवेगळे कार्यक्रम पुरुषांचे होत असतात. परंतु महिलांसाठी शालेय विदयार्थ्यांसाठी या मित्र परिवाराची दहीहंडी कार्यक्रम आयोजित करते. यामध्ये महिलांसाठी खास व्यवस्था बसण्याची करण्यात आलेली आहे. दहीहंडी फोडणाऱ्या दहीहंडी संघास ५१ हजाराचे रोख बक्षीस देण्यात येते.
व सहभागी गोविंदा पथकास अकरा हजार रुपये रक्कम व मानचिन्ह देण्यात येते. यावेळी सिने अभिनेत्री मानसी नाईक नृत्य सादर करणार आहे. इंदापूर शहरातील व तालुक्यातील नागरिकांनी महिला भगिनींनी, या महोत्सवात उपस्थित राहावे असे आवाहन यावेळी करण्यात आले आहे.




