Kalas News : गोसावीवाडी ते खर्चेवस्ती रस्त्याची दुरवस्था; खड्ड्यांचे साम्राज्य अन् काटेरी झुडपांमुळे प्रवास धोकादायक
Kalas News : इंदापूर तालुक्यातील गोसावीवाडी ते खर्चेवस्ती या सुमारे दोन किलोमीटर अंतराच्या रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे.

Kalas News : गोसावीवाडी ते खर्चेवस्ती (ता. इंदापुर) या सुमारे दोन किलोमीटर अंतराच्या रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे. रस्त्यावरील खड्डे आणि दुतर्फा वाढलेली काटेरी झुडपे यामुळे हा मार्ग प्रवासासाठी धोकादायक बनला असून, संबंधित विभागाने तातडीने दुरुस्ती करावी, अशी मागणी ग्रामस्थ करत आहेत. (Kalas News)
अनेक दिवसांपासून या रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य आहे. रस्ता अरुंद असून दोन्ही बाजूंनी काटेरी झाडे-झुडपे वाढली आहेत. यामुळे समोरून येणाऱ्या वाहनाचा अंदाज येत नाही. विशेषतः रात्रीच्या वेळी या मार्गावरून प्रवास करणे वाहनधारकांसाठी मोठे आव्हान ठरत आहे. (Kalas News)
या झुडपांमुळे पादचाऱ्यांनाही जखमा होण्याचे प्रकार घडत आहेत. संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष जागेवर येऊन पाहणी करावी आणि हा प्रश्न कायमचा मार्गी लावावा,’ अशी आग्रही मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे. (Kalas News)
Kalas News : वायाळवस्तीपाटी-गोसावीवाडी रस्त्याची दुरवस्था; नागरिकांसह विद्यार्थ्यांना नाहक त्रास





