IND W vs SA W 2nd T20 : भारत-आफ्रिकेतील दुसरा टी-20 सामना पावसामुळे रद्द, मालिकेतील निर्णायक लढत मंगळवारी…

IND W vs SA W 2nd T20 Score Update : भारतीय महिला क्रिकेट संघ आणि दक्षिण आफ्रिका महिला क्रिकेट संघ यांच्यात आज तीन टी-20 सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना चेन्नईच्या एम चिदंबरम स्टेडियमवर आयोजित करण्यात आला होता. मात्र या दुसऱ्या टी-20 सामन्यात पावसानेच बाजी मारली. भारताविरुद्धच्या दुसऱ्या टी-20 सामन्यात नाणेफेक हरल्यानंतर दक्षिण आफ्रिकेने 20 षटकात 6 गडी गमावून 177 धावा केल्या होत्या. मात्र, आफ्रिकेचा डाव संपल्यानंतर काही वेळातच पाऊस सुरू झाला, जो संततधार सुरूच होता, त्यामुळे पंचांनी अखेर सामना रद्द करण्याचा निर्णय घेतला.
आफ्रिकेने पहिला सामना 12 धावांनी जिंकत मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली होती. आज भारताला सामना जिंकून बरोबरी साधण्याची तर आफ्रिकेला मालिकेत विजयी आघाडी घेण्याची संधी होती, मात्र पावसाने हजेरी लावत यावर पाणी फेरले. आता, मालिकेतील शेवटचा आणि निर्णायक सामना आता मंगळवारी 9 जून रोजी होणार आहे.
The second T20I between India and the Proteas Women has been abandoned due to persistent rain. 🌧️#AlwaysRising #WozaNawe#BePartOfIt #SAWvINDW pic.twitter.com/HtId6UMr77
— Proteas Women (@ProteasWomenCSA) July 7, 2024
तत्पूर्वी , दुसऱ्या सामन्यात टीम इंडियाची कर्णधार हरमनप्रीत कौरने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. पहिल्या सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागलेल्या संघात भारताने एक बदल केला आणि रिचा घोषच्या जागी उमा छेत्रीला पदार्पणाची संधी दिली. दक्षिण आफ्रिकेने आपल्या विजयी संघात कोणताही बदल केला नाही. नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या दक्षिण आफ्रिकेच्या संघाने 20 षटकांत 6 गडी गमावून 177 धावसंख्येपर्यत मजल मारली होती.
Innings Break!
South Africa post 177/6 in the first innings.
2⃣ wickets each for Deepti Sharma & Pooja Vastrakar 👏
A wicket each for Radha Yadav and Shreyanka Patil 👌
Scorecard ▶️ https://t.co/wykEMCz3xT#TeamIndia | #INDvSA | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/EYWZ4S06ke
— BCCI Women (@BCCIWomen) July 7, 2024
दक्षिण आफ्रिकेसाठी सलामीवीर तझमिन ब्रिट्सने 39 चेंडूत 6 चौकार अन् 1 षटकारासह 52 धावांची शानदार खेळी केली. तिचे या मालिकेतील सलग दुसरे अर्धशतक आहे. याव्यतिरिक्त एनेके बॉश हिने 32 चेंडूत 40, कर्णधार लॉरा वोल्वार्ड्ट 12 चेंडूत 22 आणि मारिजान कप्प हिने 14 चेंडूत 20 धावांची खेळी केली. तर क्लो ट्रायोन (12) नादिन डी क्लार्क (14) या लवकर बाद झाल्या. तर एनेरी डर्कसेन 3 चेंडूत नाबाद 12 तर एलिज़-मारी मार्क्स 1 धावेवर नाबाद राहिली.
टीम इंडियासाठी पूजा वस्त्राकर आणि दीप्ती शर्मा यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले. पूजाने 4 षटकात 37 तर दीप्तीने 4 षटकात 20 धावा दिल्या. याव्यतिरिक्त श्रेयंका पाटील आणि राधा यादव यांनी प्रत्येकी एक बळी घेतला.





