Asia Cup 2024 : आशिया कपसाठी BCCI ने भारताच्या 15 सदस्यीय संघ केला जाहीर , ‘या’ खेळाडूंना मिळाली संधी…

Women’s Asia Cup T20 2024 (Team India Squad) : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) शनिवारी महिला आशिया चषक 2024 साठी 15 सदस्यीय संघाची घोषणा केली, जी श्रीलंकेत होणार आहे. या स्पर्धेत भारतीय संघ हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली खेळताना दिसणार आहे. त्याचबरोबर स्मृती मंधानाला उपकर्णधार बनवण्यात आले आहे.
येत्या 19 जुलैपासून सुरू होणाऱ्या स्पर्धेसाठी भारतीय संघात शेफाली वर्मा, दीप्ती शर्मा, जेमिमाह रॉड्रिग्स, रिचा घोष (यष्टीरक्षक) या स्टार महिला खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे. मुख्य संघातील 15 खेळाडूंशिवाय श्वेता सेहरावत, सायका इशाक, तनुजा कंवर आणि मेघना सिंग यांचा राखीव खेळाडू म्हणून समावेश करण्यात आला आहे.
A look at the @ImHarmanpreet-led squad for #WomensAsiaCup2024 in Sri Lanka 👌👌#TeamIndia | #ACC pic.twitter.com/g77PSc45XA
— BCCI Women (@BCCIWomen) July 6, 2024
भारताला स्पर्धेच्या ‘अ’ गटात ठेवण्यात आले असून त्यात कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तान, यूएई आणि नेपाळ यांचा समावेश आहे. भारताचा पहिला सामना 19 जुलै रोजी पाकिस्तानविरुद्ध होणार आहे. यानंतर, हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील संघ स्पर्धेच्या गट टप्प्यात 21 जुलै रोजी संयुक्त अरब अमिराती आणि त्यानंतर 23 जुलै रोजी नेपाळशी सामना करेल.
आशिया कप 2024 साठी भारतीय संघ : हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना (उपकर्णधार), शेफाली वर्मा, दीप्ती शर्मा, जेमिमाह रॉड्रिग्स, रिचा घोष (विकेटकीपर), उमा छेत्री (विकेटकीपर), पूजा वस्त्राकर, अरुंधती रेड्डी, रेणुका सिंग ठाकूर, दयालन हेमलता, आशा शोभना, राधा यादव, श्रेयंका पाटील आणि सजना सजीवन.
रिजर्व खेळाडू : श्वेता सहरावत, साइका इशाक, तनुजा कंवर आणि मेघना सिंह.





