IND W vs PAK W : हरमनप्रीतने सूर्याच्या पावलावर ठेवलं पाऊल, पाकिस्तानच्या कर्णधाराशी हस्तांदोलन करणं टाळलं

IND W vs PAK W No Handshake on Toss : महिला एकदिवसीय विश्वचषक 2025 मधील सहाव्या सामन्यात भारत आणि पाकिस्तान महिला संघांमध्ये रोमांचक लढत रंगत आहे. भारतीय संघाची कर्णधार हरमनप्रीत कौरने पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात उत्कृष्ट कामगिरीसह आपला दबदबा कायम ठेवण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. मात्र, सामन्यापूर्वी नाणेफेकीदरम्यान हरमनप्रीतने पाकिस्तानच्या संघाची कर्णधार फातिमा सनाशी हस्तांदोलन न करण्याचा निर्णय घेतला, ज्यामुळे भारत-पाकिस्तान सामन्यांमधील एक परंपरा कायम राहिली.
पाकिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, तर भारतीय संघ प्रथम फलंदाजी करत आहे. नाणेफेकीदरम्यान हरमनप्रीत आणि फातिमा यांच्यात हस्तांदोलन किंवा नजरानजर झाली नाही. यापूर्वी आशिया चषकात भारतीय पुरुष संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादवनेही पाकिस्तानच्या कर्णधार आणि खेळाडूंशी हस्तांदोलन टाळले होते. इंडियन एक्सप्रेसच्या अहवालानुसार, दोन्ही संघांच्या कर्णधारांनी सामन्यापूर्वी हस्तांदोलन न करण्याचा निर्णय घेतला होता, ज्यामुळे पुरुष संघांप्रमाणेच महिला संघानेही ही परंपरा पाळली.
India vs Pakistan Match ICC Women’s World Cup 2025 🏆🚨
❌ No Handshakes,
After the Toss, Pakistan won the toss and elected to Bowl first.Indian Captain – Harmanpreet Kaur
Pakistan Captain – Fatima Sana #INDvsPAK #Cricket #SmritiMandhana pic.twitter.com/skx0BSGgrX— Globally Pop (@GloballyPop) October 5, 2025
सामन्याबद्दल बोलायचे तर फातिमा सना हिने स्मृती मंधानाला बाद करून भारताला पहिला धक्का दिला. मंधानाने 32 चेंडूत चार चौकारांसह 23 धावा काढल्या. मंधानाने आणि प्रतिकाने पहिल्या विकेटसाठी 48 धावांची भागीदारी केली. यानंतर भारताला प्रतिका रावलच्या रूपात दुसरा धक्का बसला. प्रतिका चांगली फलंदाजी करत होती, पण सादिया इक्बालने तिला गोलंदाजी करून पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. प्रतिकाने 37 चेंडूत पाच चौकारांसह 31 धावा काढल्यानंतर बाद झाली. आतापर्यत भारतीय संघाने 2 बाद 67 धावा केल्या आहेत.
भारताची प्लेइंग इलेव्हन: प्रतिका रावल, स्मृती मंधाना, हरलीन देओल, हरमनप्रीत कौर (कर्णधार), जेमिमाह रॉड्रिग्स, दीप्ती शर्मा, रिचा घोष (यष्टीरक्षक), स्नेह राणा, रेणुका सिंग ठाकूर, क्रांती गौड, श्री चरणी
हेही वाचा – Rohit Sharma : ‘रोहितने मनाचा मोठेपणा दाखवला, तरीही एवढी घाई का?’, मोहम्मद कैफचा बीसीसीआयला संतप्त सवाल
पाकिस्तानची प्लेइंग इलेव्हन: मुनीबा अली, सदफ शमास, सिद्रा अमीन, रमीन शमीम, आलिया रियाझ, सिद्रा नवाज (यष्टीरक्षक), फातिमा सना (कर्णधार), नतालिया परवेझ, डायना बेग, नश्रा संधू, सादिया इक्बाल





