IND W v WI W 3rd T20 : स्मृती मंधानाने ठोकले 30 वे अर्धशतक, टी-20 कारकिर्दीत केला नवा विक्रम…

India Women vs West Indies Women 3rd T20 (Smriti Mandhana) – भारतीय महिला क्रिकेट संघाची सलामीवीर फलंदाज स्मृती मानधना हिने वेस्ट इंडिज महिला क्रिकेट संघाविरुद्धच्या 3 सामन्यांच्या T20 मालिकेतील शेवटच्या सामन्यात अप्रतिम खेळी खेळली आणि अर्धशतक झळकावले. याआधी मंधानाने या मालिकेतील पहिल्या दोन सामन्यात अर्धशतके झळकावली होती आणि तिसऱ्या सामन्यातही तिने अशीच कामगिरी केली. या मालिकेतील तिन्ही सामन्यांमध्ये सलग अर्धशतके झळकावल्यानंतर तिने विराट कोहलीच्या विक्रमाची बरोबरी केली आहे तसेच एक इतिहासही रचला आहे.
स्मृती मंधानाने रचला इतिहास…
स्मृती मंधानाने वेस्ट इंडिजविरुद्धच्या तिसऱ्या टी-20 सामन्यात 27 चेंडूत अर्धशतक पूर्ण केले आणि या सामन्यात तिने 47 चेंडूंत एक षटकार आणि 13 चौकारांच्या मदतीने 77 धावांची शानदार खेळी केली. वेस्ट इंडिजविरुद्धच्या या टी-20 मालिकेतील पहिल्या सामन्यात मंधानाने 54 धावांची तर दुसऱ्या सामन्यात तिने 62 धावांची खेळी केली होती.
5⃣0⃣ in the 1st T20I ✅
5⃣0⃣ in the 2nd T20I ✅
5⃣0⃣ in the 3rd T20I ✅Smriti Mandhana’s fine run of form continues! 🙌 🙌
Live ▶️ https://t.co/Fuqs85UJ9W#TeamIndia | #INDvWI | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/rSKvqupmVS
— BCCI Women (@BCCIWomen) December 19, 2024
या तीन डावांमध्ये सलग अर्धशतके झळकावल्यानंतर, टी-20 मालिकेतील सलग तीन सामन्यांमध्ये 50 किंवा त्याहून अधिक धावा करणारी मंधाना ही पहिली महिला खेळाडू ठरली आहे. तसेच एकूणच, अशी कामगिरी करणारी ती भारतीय क्रिकेट इतिहासातील दुसरी भारतीय क्रिकेटर ठरली आहे.
मंधानाने विराट कोहलीची केली बरोबरी…
मंधानापूर्वी विराट कोहलीने टी-20 आंतरराष्ट्रीय मालिकेतील सलग तीन सामन्यांमध्ये अशी कामगिरी केली होती. कोहलीने 2016 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळल्या गेलेल्या T20 मालिकेत तिन्ही सामन्यांमध्ये 50 किंवा त्याहून अधिक धावा करण्याचा हा पराक्रम केला होता.





