IND vs ZIM 4th T20 :- भारत आणि झिम्बाब्वे यांच्यातील 5 सामन्यांच्या टी-20 मालिकेतील चौथा सामना 13 जुलै रोजी हरारे स्पोर्ट्स क्लब मैदानावर खेळवला जाणार आहे. मालिका विजयाच्या दृष्टिकोनातून दोन्ही संघासाठी अतिशय महत्त्वाचा असणारा हा सामना जिंकूण शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाच्या नजरा मालिका विजयाकडे असणार आहेत. भारतीय संघ 3-1 अश्या अभेद्य आघाडी घेण्याचा तर यजमान झिम्बाब्वे मालिकेत 2-2 अशी बरोबरी साधून शेवटचा सामना रोमांचक करण्याचा प्रयत्न करेल. अशा स्थितीत आता सर्वांच्या नजरा हरारे मैदानाच्या खेळपट्टीवर खिळल्या आहेत. कारण, पहिल्या तीन सामन्यांमध्ये या खेळपट्टीने विचित्र रूप दाखविलेले आहे. या मालिकेत आतापर्यंत झालेल्या तिन्ही सामन्यांमध्ये प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाचा वरचष्मा राहिला आहे. पहिल्या सामन्यात झिम्बाब्वे संघाने भारतीय संघाला लक्ष्याचा पाठलाग करू दिला नाही, असेच काहीसे पुढच्या दोन सामन्यात टीम इंडियाकडून पाहायला मिळाले. पहिला सामना नक्कीच थोडा रोमांचक झाला असला तरी शेवटच्या दोन सामन्यात टीम इंडियाने एकतर्फी विजय मिळवला होता. SL vsIND : बीसीसीआयने टीम इंडियाचा श्रीलंका दौरा केला जाहीर..! जाणून घ्या, T20 आणि ODI मालिकेचे संपूर्ण वेळापत्रक एका क्लिकवर… मैदानाबद्दल बोलायचे झाल्यास येथे वेगवान गोलंदाजांना नवीन चेंडूची खूप मदत मिळते ज्यामध्ये फलंदाजांना वेगवान धावा करणे सोपे नसते. मात्र, जसजसा चेंडू जुना होत जातो, तसतशी परिस्थिती पूर्णपणे उलट असते. या मैदानावर आतापर्यंत झालेल्या 44 टी-20 सामन्यांपैकी प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाला 24 वेळा विजय मिळवता आला आहे, तर लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या संघाला 18 वेळा सामना जिंकता आला आहे. पहिल्या डावाची सरासरी 160 धावांच्या आसपास असल्याचे दिसून आले.