SL vsIND : बीसीसीआयने टीम इंडियाचा श्रीलंका दौरा केला जाहीर..! जाणून घ्या, T20 आणि ODI मालिकेचे संपूर्ण वेळापत्रक एका क्लिकवर…

Team India tour of Sri lanka 2024 schedule announced : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) श्रीलंका दौऱ्याचे वेळापत्रक जाहीर केले आहे. टीम इंडिया 26 जुलैपासून श्रीलंकेत तीन सामन्यांची टी-20 मालिका खेळणार आहे. यानंतर 1 ऑगस्टपासून दोन्ही देशांदरम्यान तीन सामन्यांची वनडे मालिका खेळवली जाणार आहे. मात्र, या मालिकेसाठी दोन्ही मंडळांनी अद्याप संघ जाहीर केलेला नाही.
भारताच्या श्रीलंका दौऱ्याची सुरुवात 26 जुलैला पहिल्या टी-20 सामन्याने होणार आहे. हा सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7 वाजता पल्लेकेले येथे खेळवला जाईल. यानंतर दुसरा टी-20 सामना दुसऱ्या दिवशी म्हणजे 27 जुलै रोजी पल्लेकेले येथे खेळवला जाईल. टी-20 मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना 29 जुलै रोजी होणार आहे. हा सामना देखील पल्लेकेले येथेच होणार आहे.
टी-20 मालिकेनंतर 1 ऑगस्टपासून तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे. वनडे मालिकेतील पहिला सामना 1 ऑगस्टला, दुसरा सामना 4 ऑगस्टला आणि तिसरा आणि शेवटचा सामना 7 ऑगस्टला होणार आहे. एकदिवसीय मालिकेतील सर्व सामने कोलंबोमध्ये खेळवले जातील.
श्रीलंका दौऱ्याचे संपूर्ण वेळापत्रक (टी-20 आणि वनडे मालिका)
पहिला टी-20 सामना – 26 जुलै – संध्याकाळी 7 वाजता
दुसरा टी-20 सामना – 27 जुलै – संध्याकाळी 7 वाजता
तिसरा टी-20 सामना – 29 जुलै – संध्याकाळी 7 वाजता
पहिला वनडे सामना – 1 ऑगस्ट – दुपारी 2.30 वाजता
दुसरा वनडे सामना – 4 ऑगस्ट – दुपारी 2.30 वाजता
तिसरा वनडे सामना – 7 ऑगस्ट – दुपारी 2.30 वाजता
🚨 NEWS 🚨
Fixtures for the upcoming India tour of Sri Lanka announced! 📢#TeamIndia | #SLvIND pic.twitter.com/oBCZn0PlmK
— BCCI (@BCCI) July 11, 2024
या दौऱ्यापासून सुरू होईल गंभीरचा कार्यकाल…
भारतीय क्रिकेट बोर्डाने माजी दिग्गज फलंदाज गौतम गंभीरची टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती केली आहे. गंभीर भारताच्या श्रीलंका दौऱ्यापासून जबाबदारी स्वीकारणार आहे. श्रीलंकेविरुद्धची तीन सामन्यांची टी-20 मालिका ही गौतम गंभीरची प्रशिक्षक म्हणून पहिली असाइनमेंट असेल. मात्र, बीसीसीआयने अद्याप भारताच्या नव्या टी-20 कर्णधाराची घोषणा केलेली नाही.
खरंतर रोहित शर्माने टी-20 वर्ल्ड कप जिंकल्यानंतर या फॉरमॅटमधून निवृत्ती घेतली होती. अशा परिस्थितीत आता टीम इंडिया नव्या कर्णधाराच्या नेतृत्वाखाली खेळणार आहे. बीसीसीआयने अद्याप श्रीलंका दौऱ्यासाठी टी-20 आणि एकदिवसीय मालिकेसाठी संघ जाहीर केलेला नाही.





