IND vs ZIM 3rd T20 : गिल-गायकवाडची जोरदार फटकेबाजी, भारताचे झिम्बाब्वेसमोर 183 धावांचे लक्ष्य…

India vs Zimbabwe 3rd T20 Live Score Update : आज भारत आणि झिम्बाब्वे यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेतील तिसरा सामना खेळला जात आहे. या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि 20 षटकांत 4 गडी गमावून 182 धावसंख्येपर्यंत मजल मारली आहे. आता झिम्बाब्वेला विजयासाठी 183 धावा कराव्या लागणार आहेत. पहिला T20 गमावल्यानंतर भारताने दुसऱ्या T20 मध्ये झिम्बाब्वेचा 100 धावांनी पराभव करत पाच सामन्यांच्या मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली होती. हा सामना जिंकून भारतीय संघाचा मालिकेत 2-1 अशी आघाडी घेण्याचा प्रयत्न असेल.
Innings Break!
Captain @ShubmanGill top-scores with 66(49) as #TeamIndia post 182/4 in the first innings 💪
Over to our bowlers 🙌
Scorecard ▶️ https://t.co/FiBMpdYQbc#ZIMvIND pic.twitter.com/6q46FzzkgP
— BCCI (@BCCI) July 10, 2024
झिम्बाब्वेविरुद्धच्या या सामन्यात भारतीय संघाची सुरुवात चांगली झाली . यशस्वी जैस्वाल आणि शुभमन गिल यांच्यात पहिल्या विकेटसाठी 67 धावांची भागीदारी झाली जी नवव्या षटकात सिकंदर रझाने तोडली. त्याने जैस्वालला बेनेटकरवी झेलबाद केले. तो 27 चेंडूत 36 धावा करू शकला. या दरम्यान युवा फलंदाजाने 133.33 च्या स्ट्राईक रेटने चार चौकार आणि दोन षटकार मारले. यानंतर अभिषेक शर्मा आला. मात्र, त्याला मागील कामगिरीची पुनरावृत्ती करता आली नाही. अवघ्या 10 धावा करून तो पॅव्हेलियनमध्ये परतला.
यानंतर ऋतुराज गायकवाड याने पदभार स्वीकारला. त्याने शुभमन गिलसोबत तिसऱ्या विकेटसाठी 72 धावांची भागीदारी केली. 18व्या षटकातील पाचव्या चेंडूवर मुझाराबानीने भारताला तिसरा धक्का दिला. त्याने कर्णधाराला बाद केले. गिलने या सामन्यात आपल्या टी-20 आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील तिसरे अर्धशतक झळकावले. यादरम्यान त्याने 49 चेंडूत 66 धावांची खेळी केली. त्याच्या बॅटमधून सात चौकार आणि तीन षटकार आले. तर ऋतुराज गायकवाडने 49 धावांची तुफानी खेळी केली. मात्र, त्याला आपले अर्धशतक पूर्ण करता आले नाही. 28 चेंडूंचा सामना करताना त्याने चार चौकार आणि तीन षटकार मारले. भारताकडून संजू सॅमसन 12 तर रिंकू सिंग एका धावेवर नाबाद राहिला.
Gautam Gambhir Salary : द्रविडपेक्षा गंभीरला मिळणार जास्त मानधन? जाणून घ्या, किती असेल फरक…
झिम्बाब्वेच्या खेळाडूंचे क्षेत्ररक्षण अतिशय खराब झाले, त्यामुळे संघाने किमान 10-15 अतिरिक्त धावा दिल्या आणि बरेच झेलही सोडले. यजमान संघाकडून कर्णधार सिकंदर रझा याने दोन आणि ब्लेसिंग मुजरबानीनं एक बळी घेतला.





