IND vs WI : ‘फिल्डिंग सुधारा!’ अभिषेक शर्माच्या चुकीमुळे कर्णधार सूर्या संतापला; ईडन गार्डन्सवर भारत-विंडीज हायव्होल्टेज ड्रामा
IND vs WI : भारतीय क्षेत्ररक्षकांनी, विशेषतः युवा खेळाडू अभिषेक शर्माने दिलेल्या जीवनदानांचा फायदा घेत वेस्ट इंडिजने दमदादर फटकेबाजी करत ४ गडी गमावून १९५ धावांचा डोंगर उभारला आहे.

IND vs WI Abhishek Sharma Two catches dropped : टी-२० विश्वचषक २०२६ मधील शेवटच्या सुपर-८ सामन्यात भारताची सुरुवात खराब क्षेत्ररक्षणामुळे निराशाजनक झाली आहे. नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा कर्णधार सूर्यकुमार यादवचा निर्णय सुरुवातीला फसला असे चित्र पाहायला मिळाले. भारतीय क्षेत्ररक्षकांनी, विशेषतः युवा खेळाडू अभिषेक शर्माने दिलेल्या जीवनदानांचा फायदा घेत वेस्ट इंडिजने दमदादर फटकेबाजी करत ४ गडी गमावून १९५ धावांचा डोंगर उभारला आहे.
अभिषेक शर्माचे ‘महागडे’ दोन सुटलेले झेल –
सामन्याच्या सुरुवातीच्या सहा षटकांत (पावरप्ले) भारतीय संघ क्षेत्ररक्षणात पूर्णपणे निष्प्रभ ठरला. युवा खेळाडू अभिषेक शर्माने दोन अत्यंत सोपे झेल सोडल्याने कर्णधार सूर्यकुमार यादव मैदानात प्रचंड निराश दिसला. पाचव्या षटकात जसप्रीत बुमराहच्या गोलंदाजीवर रोस्टन चेसने मोठा फटका मारला. यावेळ एक्स्ट्रा कव्हरला उभा असलेला अभिषेक शर्मा चेंडूखाली पोहोचला होता, मात्र १५ धावांवर खेळत असलेल्या चेसचा सोपा झेल त्याने सोडला.
यानंतर १९ व्या षटकात अर्शदीप सिंगच्या गोलंदाजीवर रोव्हमन पॉवेलचा झेल घेण्याची संधी असताना डीप मिड-विकेटला उभ्या असलेल्या अभिषेकने पुन्हा एकदा चूक केली आणि महत्त्वाचा झेल सोडला. अभिषेक शर्माने हे दोन झेलने टीम इंडियाला चांगलेच महागात पडले, ज्यामुळे वेस्ट इंडिज संघाला मोठ्या धावसंख्येकडे कूच करता आली.
चेस आणि होपची धमाकेदार सलामी –
If India loses the match today, Abhishek Sharma will be the biggest villain.
Abhishek Sharma didn’t play responsibly today.
For one reason, he dropped two easy catches.Today, the entire responsibility rests on Sanju Samson, and Suryakumar Yadav is less trusted.
After that, he… pic.twitter.com/wyCZsVAVFZ— Geeta Alwar (@Geeta_Alwar_02) March 1, 2026
मिळालेल्या जीवनदानाचा पूर्ण फायदा घेत रोस्टन चेस आणि शाई होप यांनी पहिल्या विकेटसाठी ६८ धावांची दमदार भागीदारी केली. शाई होपने ३३ चेंडूंत ३२ धावांची खेळी केली, ज्यामध्ये तीन चौकारांचा समावेश होता. फिरकीपटू वरुण चक्रवर्तीने होपला बाद करत भारताला पहिले यश मिळवून दिले.
मात्र, चेसने एका बाजूने खिंड लढवत वेस्ट इंडिजची धावगती कायम ठेवली. तो २५ चेंडूंत ४० धावांचे योगदान देऊन बाद झाला. ज्यामुळे वेस्ट इंडिजला १९५ धावांपर्यंत मजल मारता आली. आता उपांत्य फेरीचे तिकीट मिळवण्यासाठी भारतीय फलंदाजांना ईडन गार्डन्सच्या खेळपट्टीवर आपली ताकद दाखवावी लागणार आहे.






