IND vs WI 3rd ODI : वेस्ट इंडिजचा Toss जिंकून गोलंदाजींचा निर्णय; Team India मध्ये दोन बदल…

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील वनडे मालिकेतील तिसरा आणि निर्णायक सामना त्रिनिदादच्या ब्रायन लारा स्टेडियमवर होत आहे. दोन्ही संघांनी प्रत्येकी एक सामना जिंकला असून तीन सामन्यांच्या मालिकेत 1-1 अशी बरोबरी आहे. हा सामना जिंकणारा संघ मालिकेवरही नाव कोरेल.
वेस्ट इंडिजचा कर्णधार शाई होपने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या मालिकेत दोन्ही सामन्यात प्रथम गोलंदाजी करणा-या संघाने सामने जिंकले आहेत. त्यामुळे कर्णधार होपने पुन्हा एकदा गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे.
वेस्ट इंडिजच्या संघात कोणताही बदल झालेला नाही. त्याचवेळी भारतीय संघ दोन बदलांसह मैदानात उतरला आहे. अक्षर पटेल आणि उमरान मलिक यांच्या जागी ऋतुराज गायकवाड आणि जयदेव उनाडकट यांचा संघात समावेश करण्यात आला आहे.
दोन्ही संघाचे प्लेइंग 11 पुढीलप्रमाणे :-
वेस्ट इंडिज : ब्रेंडन किंग, काइल मेयर्स, अलिक अथंजे, शाई होप (wk/c), शिमरॉन हेटमायर, केसी कार्टी, रोमॅरियो शेफर्ड, यानिक कारिया, अल्झारी जोसेफ, गुडाकेश मोती, जयडेन सेल्स.
भारत : इशान किशन (यष्टीरक्षक), शुभमन गिल, ऋतुराज गायकवाड, संजू सॅमसन, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या (कर्णधार), रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, जयदेव उनाडकट, कुलदीप यादव, मुकेश कुमार.





