IND vs WI 1st Test : शुबमन गिलचा ऐतिहासिक पराक्रम! २१व्या शतकात ‘ही’ खास कामगिरी करणारा पहिलाच भारतीय कर्णधार

शुभमन गिलने 300 चौकारांचा टप्पा केला पार –
कर्णधार शुबमन गिलने या सामन्यात 50 धावांची खणखणीत खेळी करत एक खास विक्रम नोंदवला. ते 21व्या शतकात मायदेशात कर्णधार म्हणून पहिल्याच डावात 50 पेक्षा अधिक धावा करणारा पहिला भारतीय कर्णधार ठरला. यापूर्वी विराट कोहली, रोहित शर्मा आणि महेंद्रसिंग धोनी यांना हा पराक्रम करता आला नव्हता. याआधी सुनील गावस्कर यांनी 1978 मध्ये वानखेडे येथे वेस्ट इंडिजविरुद्धच्या 205 धावांची खेळी साकरत हा विक्रम नोंदवला होता. गिलने त्याच्या खेळीत 5 चौकारांसह 50 धावा केल्या आणि कसोटी क्रिकेटमध्ये त्याच्या 300 चौकारांचा टप्पा पूर्ण केला.
5️⃣0️⃣ and out for Shubman Gill!
But did you know that he is the first Indian captain to score 5️⃣0️⃣ in his debut innings at home, since Sunil Gavaskar in 1978 🤯
Take a guess on how much Gavaskar scored in that innings 🤔#indvswi #indiacricket #ShubmanGill pic.twitter.com/PBQHWyAtEw
— Cricbuzz (@cricbuzz) October 3, 2025
केएल राहुलने झळकावले शानदार शतक –
केएल राहुलने सावध आणि आक्रमक फलंदाजीचे प्रदर्शन करताना शतक झळकावले. त्याच्या या खेळीने भारताला ड्रायव्हिंग सीटवर आणले. याशिवाय यशस्वी जैस्वालने 36 धावांचे योगदान दिले. गिलने आपली खेळी मोठी करता आली नाही आणि तो 50 धावांवर बाद झाला. वेस्टइंडीजच्या गोलंदाजांना भारतीय फलंदाजांना रोखण्यात यश आलेले नाही. सामन्याचा दुसरा दिवस भारतासाठी आणखी यश घेऊन येण्याची शक्यता आहे. ध्रुव जुरेलने त्याचे पहिले कसोटी शतक झळकावले. वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी त्याने चौकार मारून आपले शतक पूर्ण केले. कसोटीतील त्याची मागील सर्वोत्तम कामगिरी ९० होती. कसोटी शतक झळकावणारा तो १२ वा भारतीय यष्टिरक्षक-फलंदाज आहे.
दुसऱ्या दिवशी खेळाचे चौथ सत्र सुरू आहे. भारताने चार विकेट्स गमावून 394 धावा केल्या आहेत. रवींद्र जडेजा सध्या 82 धावांसह आणि ध्रुव जुरेल 104 धावांसह खेळत आहेत. दोघांनी आता 176 धावांची भागीदारी केली आहे. भारताने आता वेस्ट इंडिजवर 232 धावांची आघाडी घेतली आहे.





