IND vs SL : नवीन प्रशिक्षक-कर्णधारासह टीम इंडिया श्रीलंकेत दाखल..! मुंबईपासून पल्लेकेलेपर्यंत खेळाडूंनी केली खूप मस्ती, BCCI ने Video केला शेअर…

Team India have reached Sri Lanka : भारत आणि श्रीलंका यांच्यात टी-20 आणि एकदिवसीय मालिका होणार आहे. ही मालिका श्रीलंकेत खेळवली जाणार आहे. यासाठी भारतीय संघ श्रीलंकेत पोहोचला आहे. दोन्ही संघांमध्ये प्रथम टी-20 मालिका खेळवली जाणार आहे. त्यानंतर वनडे मालिका आयोजित केली जाईल. सध्या टी-20 मालिकेसाठी निवडलेले भारतीय खेळाडू श्रीलंकेला गेले आहेत. एकदिवसीय संघ अद्याप तेथे पोहोचलेला नाही. दोन्ही संघांमध्ये एकूण तीन टी-20 सामने खेळवले जाणार आहेत. एकदिवसीय मालिकेतही तेवढेच सामने खेळवले जाणार आहेत. भारताने नुकतेच टी-20 विश्वचषक जिंकला आहे. वर्ल्ड कपनंतर टीम इंडियाची ही दुसरी सीरिज असणार आहे.
टी-20 संघात अनेक मोठे बदल
टी-20 विश्वचषक 2024 जिंकल्यानंतर टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झालेले स्टार खेळाडू रोहित शर्मा आणि विराट कोहली श्रीलंकेच्या वनडे मालिकेत खेळणार आहेत. दोघेही काही दिवसात भारतीय संघात सामील होतील. तत्पूर्वी, असे मानले जात होते की एकदिवसीय आणि कसोटी कर्णधार रोहित आणि विराट श्रीलंका दौऱ्यावर जाणार नाहीत परंतु त्यांची उपस्थिती स्पष्टपणे दर्शवते की संघ व्यवस्थापन या दोन वरिष्ठ खेळाडूंना जास्तीत जास्त सामने खेळताना पाहू इच्छिते.
बीसीसीआयने श्रीलंकेविरुद्ध निवडलेल्या टी-20 संघात अनेक बदल पाहायला मिळाले आहेत. रोहित शर्माच्या निवृत्तीनंतर या फॉरमॅटमध्ये टीम इंडियाचा नवा कर्णधार कोण असेल, हा सर्वात मोठा प्रश्न बीसीसीआयसमोर निर्माण झाला होता. विश्वचषकादरम्यान भारतीय क्रिकेट संघाचा उपकर्णधार असलेल्या हार्दिककडे टीम इंडियाचे कर्णधारपद सोपवले जाईल, असे मानले जात होते, परंतु बीसीसीआयने आश्चर्यकारक निर्णय घेत सूर्यकुमार यादवला या फॉरमॅटमध्ये भारताचा नवा कर्णधार बनवले आहे.
गौतम गंभीरने स्वीकारला पदभार अन् प्रशिक्षण-सरावालाही प्रारंभ….
भारतीय संघ सोमवारी मुंबईहून श्रीलंकेला रवाना झाला. टीम इंडिया तब्बल 2 तासांनंतर श्रीलंकेची राजधानी कोलंबोत पोहोचली. त्यानंतर भारतीय संघ बसने पल्लेकेलेला पोहोचला. दोन्ही संघांमधील टी-20 मालिकेतील पहिला सामना येथे होणार आहे. या मालिकेसाठी टीम इंडिया नवे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरसह दाखल झाली आहे.भारतीय संघाचा प्रशिक्षक म्हणून गंभीरची ही पहिलीच मालिका असणार आहे. अशा स्थितीत विश्वविजेत्या संघाला प्रशिक्षण देणेही त्याच्यासाठी सोपे नसेल. गंभीरला त्याच्या पहिल्या मिशनमध्ये चांगली छाप पाडायची आहे. दरम्यान, श्रीलंकेत पोहचताच मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी पदभार स्वीकारला आहे. यासंदर्भात पल्लेकेले इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियमवरील गौतम गंभीर खेळाडूंना प्रशिक्षण देत असल्याचा आणि संघाचा सरावाचा व्हिडीओसुध्दा बीसीसीआयने ट्विटरवर पोस्ट केला आहे.
𝗛𝗲𝗮𝗱 𝗖𝗼𝗮𝗰𝗵 𝗚𝗮𝘂𝘁𝗮𝗺 𝗚𝗮𝗺𝗯𝗵𝗶𝗿 𝗧𝗮𝗸𝗲𝘀 𝗖𝗵𝗮𝗿𝗴𝗲! 💪#TeamIndia | #SLvIND | @GautamGambhir pic.twitter.com/sbG7VLfXGc
— BCCI (@BCCI) July 23, 2024
पल्लेकेलेपर्यंत खेळाडूंनी केली खूप मजा; व्हिडिओ झाला व्हायरल…
बीसीसीआयने मुंबईहून पल्लेकेलेला पोहोचल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) खेळाडूंचा एक मनोरंजक व्हिडिओ शेअर केला आहे, जो वेगाने व्हायरल होत आहे. मुंबई ते पल्लेकेलेपर्यंत खेळाडूंनी खूप मजा केली. बीसीसीआयने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग, अष्टपैलू अक्षर पटेल आणि शुभमन गिल हसताना आणि विनोद करताना दिसत आहेत. कॅप्टन सूर्यकुमार यादव याने विमानतळावर सहकाऱ्यांसोबत फोटो काढले आहेत. त्याचवेळी पल्लेकेलेमध्ये पोहोचल्यानंतर हॉटेलमध्ये टीम इंडियाचे जंगी स्वागत करण्यात आले.
Mumbai to Pallekele via Colombo ✈️ 🚌#TeamIndia have reached Sri Lanka 🇱🇰#SLvIND pic.twitter.com/ffDYJOV7wm
— BCCI (@BCCI) July 22, 2024
भारत विरुद्ध श्रीलंका मालिकेचे वेळापत्रक
27 जुलै- पहिला T20 सामना, पल्लेकेले
28 जुलै- दुसरा T20 सामना, पल्लेकेले
30 जुलै- तिसरा T20 सामना, पल्लेकेले
2 ऑगस्ट- पहिला वनडे सामना, कोलंबो
4 ऑगस्ट, दुसरा वनडे सामना, कोलंबो
7 ऑगस्ट, तिसरा वनडे सामना, कोलंबो
टी-20 आणि एकदिवसीय मालिकेसाठी टीम इंडियाचा संघ
टी 20 टीम : सूर्यकुमार यादव (कर्णधार), शुभमन गिल (उपकर्णधार), यशस्वी जयसवाल, रिंकू सिंह, रियान पराग, ऋषभ पंत (विकेटकीपर), संजू सैमसन (विकेटकीपर), हार्दिक पांड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल, वाशिंगटन सुंदर, रवि बिश्नोई, अर्शदीप सिंह, खलील अहमद, मोहम्मद सिराज
एकदिवसीय संघ : रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल (उपकर्णधार), विराट कोहली, केएल राहुल (यष्टीरक्षक), ऋषभ पंत (यष्टीरक्षक), श्रेयस अय्यर, शिवम दुबे, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, वॉशिंग्टन सुंदर, अर्शदीप सिंग, रियान पराग, अक्षर पटेल, खलील अहमद, हर्षित राणा





