IND vs SL 3rd ODI : श्रीलंकेचा Toss जिंकून फलंदाजीचा निर्णय..! भारतीय संघात दोन मोठे बदल, जाणून घ्या Playing 11

IND vs SL 3rd ODI (Toss & Playing XI Update): भारत आणि श्रीलंका यांच्यात आज तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील शेवटचा सामना खेळला जात आहे. या मालिकेत भारत 1-0 ने पिछाडीवर आहे. आता टीम इंडियाचा प्रयत्न हा सामना जिंकून मालिकेत 1-1 ने बरोबरी साधण्याचा असेल.
तत्पूर्वी झालेला नाणेफेकीचा कौल हा श्रीलंकेच्या बाजूनं लागला आहे. श्रीलंकेचा कर्णधार चरिथ असलंका याने टाॅस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे भारतीय संघाला प्रथम क्षेत्ररक्षणासाठी मैदानात उतरावं लागेल. भारतीय संघ दोन बदलांसह या सामन्यात दाखल झाला आहे. रियान परागला पदार्पणाची संधी मिळाली आहे. त्याचबरोबर ऋषभ पंतला संघात संधी देण्यात आली आहे तर केएल राहुल आणि अर्शदीप सिंगला विश्रांती देण्यात आली आहे.
🚨 Toss Update 🚨
Sri Lanka elect to bat in the 3rd ODI.
Follow the Match ▶️ https://t.co/Lu9YkAmnek#TeamIndia | #SLvIND pic.twitter.com/sUc2VQPP4B
— BCCI (@BCCI) August 7, 2024
दोन्ही संघांची प्लेइंग 11 खालीलप्रमाणे…
भारत : रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), श्रेयस अय्यर, रियान पराग, शिवम दुबे, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज.
श्रीलंका : पाथुम निसांका, अविष्का फर्नांडो, कुसल मेंडिस (विकेटकीपर), सदिरा समरविक्रमा, चरिथ असलंका (कर्णधार), जेनिथ लियानागे, कामिंडू मेंडिस, दुनिथ वेलालागे, महिष टेकशाना, जेफ्री वेंडरसे, असिथा फर्नांडो.
दरम्यान, भारताने 27 वर्षांपासून श्रीलंकेविरुद्ध एकही वनडे मालिका गमावलेली नाही. याचा अर्थ यजमानांच्या घरात भारताचे सार्वभौमत्वही (बादशाहत) धोक्यात आले आहे. आता भारतीय क्रिकेटच्या गंभीर युगात हे असेच सुरू राहते की श्रीलंकेचा संघ काही उलटफेर करेल हे पाहायचे आहे.
भारताने शेवटची वनडे मालिका 1997 मध्ये श्रीलंकेत 0-3 ने गमावली होती. तेव्हा सचिन तेंडुलकर कर्णधार होता. 1997 मध्ये झालेल्या मालिकेपासून भारत आणि श्रीलंका यांच्यात 11 द्विपक्षीय एकदिवसीय मालिका खेळली गेली असून भारताने एकही मालिका गमावलेली नाही. मात्र, सध्या सुरू असलेल्या मालिकेतील दुसऱ्या वनडेत 32 धावांनी पराभव आणि पहिला सामना अनिर्णित राहिल्यानंतर भारताची सध्याची मालिका जिंकण्याची शक्यता संपुष्टात आली आहे.





