IND vs SA 2nd T20 :- पहिल्या टी-२० लढतीत भारताने दक्षिण आफ्रिका संघाला ६१ धावांनी पराभूत करताना, भारत व दक्षिण आफ्रिका संघाच्या दरम्यान सुरु असलेल्या चार सामान्यांच्या टी-२० मालिकेत १-० अशी आघाडी घेतली.
आज दुसरा टी-२० सामना
वेळ : सायं ७.३० पासून
ठिकाण : सेंट जॉर्ज पार्क, गकेबरहा
दक्षिण आफ्रिका संघ पहिल्या लढतीत पराभूत झाल्याने जोरदार पुनरागमन करण्यासाठी सज्ज असणार आहे तर पहिल्या लढतीसारखेच फलंदाजीच्या जोरावर लढत एकतर्फी करण्यासाठी भारतीय संघ तयारी करत आहे. रविवारी हा सामना गकेबरहा (द. आफ्रिका) येथील सेंट जॉर्ज पार्क मैदानावर दुसरी लढत होणार आहे.
संजू सॅमसनने पहिल्या टी-२० लढतीमध्ये दमदार कामगिरी करताना केवळ ५० चेंडूत शतकी खेळी केली. त्याच्या खेळीच्या जोरावर भारताने ८ बाद २०२ धावांचा डोंगर उभारला होता. तिलक वर्माने ३३ तर कर्णधार सूर्यकुमार यादवने २१ धावांचे योगदान दिले. गोलंदाजीत देखील भारताच्या फिरकीपटूनी दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांची फिरकी घेतली. रवी बिष्णोई व वरून चक्रवर्तीने प्रत्येकी ३ फलंदाज तंबूत पाठवले. आवेश खानने २ तर अर्शदीपने १ बळी टिपला. एकंदरीत गोलंदाजी विभागात सर्वानीच चांगली कामगिरी बजावली.
संजू वगळता इतरांची कामगिरी
बांगलादेशपासून सुरु केलेला झंजावात संजू सॅमसनने द. दक्षिण आफ्रिकेत देखील सुरूच ठेवला आहे. त्याने पहिल्या लढतीत शतक झळकावले. असे असले तरी इतर आघाडीच्या फलंदाजांना शुक्रवारच्या लढतीत काही विशेष करता आले नाही. त्यामुळे पुन्हा एकदा फलंदाजी ही संघ व्यवस्थापनासाठी चिंतेची बाब असणार आहे. सलामीवीर अभिषेक शर्मा कालच्या लढतीत ७ धावा काढून परतला. त्याने वर्षाच्या सुरुवातीला हरारेमध्ये झिम्बाब्वेविरुद्ध शतक केले होते. त्यानंतर मात्र त्याला मोठी खेळी करण्यास सातत्याने अपयश येत आहे. निवडसमिती अजूनही त्यांच्यावर विश्वास दाखवत आहे, त्यामुळे त्याला मिळालेल्या संधीचा अजूनही फायदा घेता आला नाही. हार्दिक पंड्या, रिंकू सिंग यांना देखील शुक्रवारच्या लढतीत चांगली कामगिरी करता आली नाही.
.
तिलक वर्मा…
रविवारी होणाऱ्या लढतीमध्ये भारताच्या अंतिम ११ खेळाडूंमध्ये बदल होण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे नवीन खेळाडूंना या लढतीत संधी मिळणार नाही. भारताचा कसोटी कर्णधार रोहित शर्माने टी-२० मधून निवृत्ती घेतली आहे. त्यामुळे संघ व्यवस्थापन या जागेसाठी विविध प्रयोग करताना दिसून येत आहे. यामध्ये अभिषेक शर्माला अनेक संधी देऊन देखील त्याला विशेष काही करता आलेले नाही. संघ व्यवस्थापन इतर पर्याय शोधात असताना शुक्रवारच्या लढतीमध्ये तिलक वर्माने १८ चेंडूत ३३ धावांची तुफानी खेळी करताना निवड समितीचे लक्ष वेधले आहे. वर्माला चांगल्या सुरुवातीचे रूपांतर मोठ्या खेळ्यांमध्ये करावे लागणार आहे. मधल्या फळीतील स्थान निश्चित करण्यासाठी मोठी स्पर्धा असल्याने त्याला या दौऱ्यात चांगली कामगिरी करावीच लागणार आहे. भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादवलाही पहिल्या सामन्यात चांगल्या सुरुवातीचा फायदा उठवता आला नाही. तर अष्टपैलू हार्दिक पांड्याही अपेक्षेप्रमाणे राहू शकला नाही.
गोलंदाजांची समाधानकारक कामगिरी
वरुण चक्रवर्ती व रवी बिष्णोई यांनी प्रत्येकी ३ गडी बाद केले. वरुण चक्रवर्तीने २८ तर रवी बिष्णोईने २५ धावांच्या मोबदल्यात प्रत्येकी ३ गडी बाद केले. दोघांनी केवळ ५३ धावांच्या मोबदल्यात दक्षिण आफ्रिकेचे ६ फलंदाज तंबूत धाड़ले. वेगवान गोलंदाज आवेश खानने शुक्रवारी वेगवान मारा केला. आवेश खान व अर्शदीप यांनी सुरुवातीपासून चांगली गोलंदाजी करताना आफ्रिकेच्या फलंदाजांना जखडून ठेवण्यात यश मिळविले. तरी दोघांची लढतीतील सरासरी साडे ८ पेक्षा अधिक राहिली. आवेशखानने २ तर अर्शदीपला १ बाली मिळविता आला. दक्षिण आफ्रिका संघाला जूनमध्ये झालेल्या विश्वकरंडक स्पर्धेतील पराभावाचा बदला घेण्यासाठी उत्सुक असणार आहे. मात्र त्यांना अनेक वरिष्ठ खेळाडूंची उणीव भासत आहे. कालच्या लढतीतील विजयासह भारताने सलग ११ विजयाची नोंद केली आहे. त्यामुळे भारताची विजय मोहीम थांबविण्यासाठी दक्षिण आफ्रिकेच्या युवा खेळाडूंना आंतरराष्ट्रीय कामगिरी करावी लागणार आहे.
IND vs SA 1st T20 : टीम इंडियानं डर्बन गाजवलं, पहिल्याच सामन्यात द. आफ्रिकेला 61 धावांनी लोळवलं…
IND vs SA : सामन्याची वेळ काय…
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसरा सामना रविवारी सेंट जॉर्ज पार्क स्टेडियमवर होणार आहे. हा सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7.30 वाजता सुरू होईल. तर पहिला सामना रात्री 8.30 पासून खेळवण्यात आला. पहिला सामना डर्बन येथे झाला. या कारणास्तव त्याची वेळ वेगळी होती.
IND vs SA : सामना विनामूल्य कोठे पाहू शकाल….
टीम इंडिया या मालिकेत चार सामने खेळणार आहे. स्पोर्ट्स 18 (Sports 18) आणि कलर्स सिनेप्लेक्स (Colors Cineplex) या टीव्ही वाहिनीवर ही मालिका पाहता येईल. जर प्रेक्षकांना दुसरा टी-20 सामना मोबाईलवर पाहायचा असेल तर तेही शक्य आहे. यासाठी तुम्हाला जियो सिनेमा (Jio Cinema) ॲप डाउनलोड करावे लागेल. येथे तुम्ही सामना विनामूल्य पाहू शकता.
IND vs SA : दुसऱ्या T20 दरम्यान हवामान कसे असेल?
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसऱ्या सामन्याच्या दिवशी हवामान थंड राहू शकते. हवामान खात्याच्या अंदाजानुसार तापमान 16 अंश सेल्सिअसच्या आसपास राहू शकते. पावसाची शक्यता फारच कमी आहे. त्यामुळे सामन्यादरम्यान कोणतीही समस्या निर्माण होण्याची शक्यता नगण्य आहे.
संघ खालीलप्रमाणे आहेत.
भारत : सूर्यकुमार यादव (कर्णधार), अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), रिंकू सिंग, तिलक वर्मा, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, रमणदीप सिंग, वरुण चक्रवर्ती, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, विजयकुमार विशाख, आवेश खान, यश दयाल.
दक्षिण आफ्रिका : एडन मार्कराम (कर्णधार), ओटनील बार्टमन, गेराल्ड कोएत्झी, डोनोव्हन फरेरा, रीझा हेंड्रिक्स, मार्को जॅन्सन, हेनरिक क्लासेन, पॅट्रिक क्रुगर, केशव महाराज, डेव्हिड मिलर, मिहलाली एमपोंगवाना, नकाबा पीटर, रायन रिकेल्टन, लुई सिमेला, लुई सिमेला (तीसरा आणि चौथा सामना), आणि ट्रिस्टन स्टब्स.