IND vs SA : रोमांचक सामन्यात भारताने मारली बाजी! शेवटच्या षटकात दक्षिण आफ्रिकेला चारली धूळ

IND vs SA India beat South Africa by 17 : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत दारुण पराभव पत्करलेल्या टीम इंडियाने वनेड मालिकेत मात्र विजयी सलामी दिली आहे. रांची येथे खेळल्या गेलेल्या पहिल्या वनडे सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेचा १७ धावांनी पराभव केला. त्याचबरोबर तीन सामन्यांच्या मालिकेत १-० ने आघाडी घेतली. या विषयात भारतासाठी विराट कोहली आणि कुलदीप यादवने महत्त्वाची भूमिका बजावली.
या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना विराट कोहलीचे (१३५) शतक आणि रोहित शर्मा (५७) आणि केएल राहुलच्या (६०) अर्धशतकांच्या मदतीने ५० षटकांत ८ गडी गमावून ३४९ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात दक्षिण आफ्रिकेला ४९.२ षटकांत केवळ ३३२ धावा करता आल्या आणि त्यांचा संपूर्ण संघ आटोपला. पाहुण्या संघाकडून मॅथ्यू ब्रिट्झके, मार्को जॅन्सन आणि कॉर्बिन बॉश यांनी अर्धशतकी खेळी केली. दक्षिण आफ्रिकेकडून गोलंदाजीत प्रेनेलन सुब्रायेन वगळता सर्वांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या.
A last-over thriller in Ranchi! #TeamIndia held their nerve in a high-scoring clash to go 1-0 up! 🥶
Next stop ➡ Raipur 👊#INDvSA 2nd ODI 👉 WED, 3rd DEC, 12:30 PM pic.twitter.com/mIVVeUNFV9
— Star Sports (@StarSportsIndia) November 30, 2025
प्रत्युत्तरात ३५० धावांच्या विशाल लक्ष्याचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेची सुरुवात अत्यंत निराशाजनक झाली. दुसऱ्याच षटकात रीकल्टन आणि क्विंटन डी कॉक हे दोघेही खाते न उघडता पॅव्हेलियनमध्ये परतले. हर्षित राणाने या दोघांना बाद करत भारताला धमाकेदार सुरुवात करून दिली. त्यानंतर अर्शदीप सिंगने कर्णधार एडन मार्करम (७) ला बाद करून आफ्रिकेवर दबाव वाढवला.
हेही वाचा – Ayush Mhatre Century : आयुष म्हात्रेचा डबल धमाका! सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये ठोकले सलग दुसरे शतक
आफ्रिकेची झुंज आणि भारतीय गोलंदाजांचा दबदबा –
दक्षिण आफ्रिकेच्या डी जॉर्जीने ३९ धावा केल्या, पण त्याला कुलदीप यादवने एलबीडब्ल्यू केले. मधल्या फळीत मार्को यान्सेन (७०) आणि मॅथ्यू ब्रीत्झके (७२) यांनी शानदार अर्धशतकी भागीदारी करत सामन्यात रंगत आणली. पण भारतीय गोलंदाजांनी नियमित अंतराने विकेट घेत आपली पकड कायम ठेवली. यानंतर भारतीय गोलंदाजांनी दक्षिण आफ्रिकेला ५० षटकांत ३३२ धावांवर रोखले. कुलदीप यादवने चार तर हर्षित राणाने तीन गडी बाद केले. याशिवाय अर्शदीपने दोन आणि प्रसिद्ध कृष्णाने एक गडी बाद केला.





