IND vs SA : भारताविरुद्धच्या पराभवानंतर दक्षिण आफ्रिकेला बसला धक्का, आयसीसीने ‘या’ खेळाडूवर केली मोठी कारवाई…

IND vs SA T20 Match : नुकत्याच पार पडलेल्या टी-20 मालिकेत भारताने दक्षिण आफ्रिकेचा 3-1 असा पराभव केला आहे. या पराभवानंतर दक्षिण आफ्रिकेला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. आयसीसीने जेराल्ड कोएत्झीवर मोठी कारवाई केली आहे.
वास्तविक, भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात खेळल्या गेलेल्या 4 सामन्यांच्या T20 मालिकेतील शेवटच्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा स्टार गोलंदाज गेराल्ड कोएत्झीला ICC ने मोठा झटका दिला आहे. त्याने या सामन्यात पंचांच्या निर्णयावर असहमती दर्शवली होती तसेच अपशब्द वापरले होते. त्यानंतर आता आयसीसीने त्याच्यावर मोठी कारवाई केली आहे. आयसीसीने कलम 2.8 चे उल्लंघन मानले आणि त्याला 1 डिमेरिट पॉइंट दिला.
Scott Edwards, Sufyan Mehmood, and Gerald Coetzee were found guilty of breaching the ICC Code of Conduct.https://t.co/wBXgVcuEET
— ICC (@ICC) November 19, 2024
जोहान्सबर्गमध्ये खेळल्या गेलेल्या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना 283 धावा केल्या होत्या. यादरम्यान संजू सॅमसन आणि टिळक वर्मा यांनी नाबाद शतके झळकावली होती. कोएत्झी भारताच्या डावातील 15 वे षटक टाकत होता. या षटकात त्याने अंपायरला अपशब्द वापरले. या कारणास्तव त्याच्याकडून दंड आकारण्यात आला व यासोबतच 1 डिमेरिट पॉइंटही जोडला गेला आहे. महत्त्वाची बाब म्हणजे कोएत्झीनेही आपली चूक मान्य केली आहे.
कोएत्झीला किती दंड ठोठावला आहे?
आयसीसीने आपल्या वेबसाइटद्वारे माहिती दिली की, कोएत्झीला दंड ठोठावण्यात आला आहे. कोएत्झीला मॅच फीच्या 50 टक्के दंड भरावा लागेल. त्याने लेव्हल 1 चा गुन्हा केला. मॅच फीच्या दंडासोबतच त्याच्या खात्यात एक डिमेरिट पॉइंटही जमा होणार आहे.





