IND vs SA 3rd T20 : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तिसरा T20I सामना ऐतिहासिक ठरला. या सामन्यात भारताचे फलंदाज तिलक वर्मा आणि अभिषेक शर्मा यांनी शानदार फलंदाजी करत 219 धावांची मोठी धावसंख्या उभारली. यानंतर भारतीय गोलंदाजांनी शानदार गोलंदाजी करत दक्षिण आफ्रिकेला 20 षटकात 7 बाद 208 धावसंख्येवर रोखताना विजय मिळवला. भारताकडून अर्शदीप सिंगने सर्वाधिक 3 बळी घेतले. त्याचवेळी वरुण चक्रवर्तीने 2 बळी तर हार्दिक पंड्या आणि अक्षर पटेल यांना 1-1 यश मिळाले.
यावेळी अर्शदीपने इतिहास रचला. खरं तर, अर्शदीपने 4 षटकात 37 धावा देत 3 बळी घेत सर्व भारतीय वेगवान गोलंदाजांना मागे टाकत नंबर-1चा मुकुट पटकावला. एक वेगवान गोलंदाज म्हणून, अर्शदीप सिंगने जसप्रीत बुमराह आणि भुवनेश्वर कुमार सारख्या दिग्गजांना मागे टाकत भारतासाठी T20I मध्ये सर्वाधिक विकेट्स घेऊन एक महान कामगिरी केली आहे. अर्शदीपच्या नावावर आता T20I क्रिकेटमध्ये 92 विकेट्स आहेत. या सामन्यापूर्वी अर्शदीप भुवीला मागे टाकण्यापासून 2 विकेट्स दूर होता तर 89 विकेटसह बुमराहशी बरोबरी साधली होती. पण आता अर्शदीप हा T20I मध्ये सर्वाधिक विकेट घेणारा भारतीय वेगवान गोलंदाज बनला आहे.
T20I क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट घेणारे भारतीय गोलंदाज
96 बळी – युझवेंद्र चहल (79 डाव)
92* बळी – अर्शदीप सिंग (59 डाव)
90 बळी – भुवनेश्वर कुमार (86डाव)
89 बळी – जसप्रीत बुमराह (69 डाव)
88 बळी – हार्दिक पंड्या (94 डाव)
आता अर्शदीपचे लक्ष्य युझवेंद्र चहलच्या सर्वाधिक विकेट्सचे रेकॉर्ड आहे. युझवेंद्र चहलने T20I क्रिकेटमध्ये भारताकडून सर्वाधिक 96 विकेट घेतल्या आहेत. अर्शदीप सिंग आता या आकड्यापासून फक्त 4 विकेट्स दूर आहे. एवढेच नाही तर अर्शदीपकडे T20I क्रिकेटमध्ये पॉवरप्लेमध्ये भारतासाठी सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज म्हणून भुवीचा विक्रम मोडण्याची उत्तम संधी आहे.
T20I क्रिकेटमध्ये पॉवरप्लेमध्ये भारतासाठी सर्वाधिक विकेट घेणारे गोलंदाज
47 – भुवनेश्वर कुमार
37 – अर्शदीप सिंग
30 – जसप्रीत बुमराह
20 – वॉशिंग्टन सुंदर
19 – आशिष नेहरा
19 – अक्षर पटेल
भारतीय वेगवान गोलंदाजांव्दारा सर्वाधिक बळी
कसोटी – कपिल देव (434)
एकदिवसीय – जवागल श्रीनाथ (315)
टी-20 – अर्शदीप सिंग (92)*