IND vs SA 4th T20 : द.आफ्रिकेविरूध्द टीम इंडियानं Toss जिंकला, कर्णधार सूर्यानं घेतला ‘हा’ निर्णय…

IND vs SA 4th T20 Toss Update | भारताने आतापर्यंत चार सामन्यांच्या टी-20 मालिकेत दक्षिण आफ्रिकेवर 2-1 अशी आघाडी घेतली आहे. मालिकेतील चौथा आणि शेवटचा सामना आज रात्री 8.30 वाजल्यापासून जोहान्सबर्ग येथे सुरू होईल. ही मालिका चार सामन्यांची असल्याने टीम इंडिया आता मालिका गमावू शकत नाही पण ती अनिर्णित नक्कीच होऊ शकते.
तत्पूर्वी, झालेला नाणेफेकीचा कौल (Toss Update) हा भारतीय संघाच्या बाजूनं लागला आहे. भारतीय संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादव याने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. (India Won the toss and elected to bat) त्यामुळे दक्षिण आफ्रिका संघास प्रथम क्षेत्ररक्षणासाठी मैदानात उतरावं लागेल.
🚨 Toss Update 🚨
Captain @surya_14kumar wins the toss and #TeamIndia elect to bat in the final T20I 👌👌
Live – https://t.co/b22K7t9imj#SAvIND pic.twitter.com/8WWKoVMRpZ
— BCCI (@BCCI) November 15, 2024
पहिल्या सामन्यात संजू सॅमसनने तर तिसऱ्या सामन्यात तिलक वर्माच्या धमाकेदार शतकी खेळींच्या जोरावर भारताने या दोन्ही लढती जिंकल्या. मात्र या सर्वामध्ये भारताचा आक्रमक फलंदाज असलेला रिंकू सिंगचा फॉर्म मात्र संघासाठी चिंतेचा विषय झाले आहे. सध्याच्या घडीला भारताकडे 4 सामान्यांच्या मालिकेत 2-1 अशी आघाडी असली तरी देखील, ही मालिका जिंकण्याची मोठी जबाबदारी फलंदाजानावर असणार आहे.
IND vs SA : सामना विनामूल्य कोठे पाहू शकाल….





