India Vs South Africa 3rd T20I Weather Report And Forecast : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील टी-20 मालिकेतील तिसरा सामना आज रात्री 8.30 वाजता (गुरुवार, 14 डिसेंबर) जोहान्सबर्गच्या न्यू वांडरर्स स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. या मालिकेतील पहिला सामना पावसामुळे नाणेफेक न होता रद्द करण्यात आला होता. त्यानंतर दुसऱ्या सामन्यातही पाऊस पडला, त्यानंतर सामन्याचा निकाल डकवर्थ लुईस नियमानुसार सुधारण्यात आला. अशा स्थितीत आज होणाऱ्या तिसऱ्या आणि अखेरच्या टी-20 मध्येही पावसामुळे अडचणी निर्माण होणार आहेत का? चला तर मग जाणून घेऊया सामन्यादरम्यान हवामान कसे असेल.
जोहान्सबर्गमध्ये कसे असेल हवामान ?
सामन्याच्या चार तास आधी म्हणजे दुपारी 4 वाजल्यापासून पाऊस सुरू होण्याची शक्यता आहे. 4 वाजता सुमारे 2 टक्के पाऊस पडू शकतो. मग जसजशी वेळ पुढे जाईल तसतशी पावस होण्याची शक्यताही वाढत जाईल. सामना सुरू होण्याच्या अर्धा तास आधी म्हणजेच नाणेफेकीच्या वेळी 8 वाजता पावसाची शक्यता 16 टक्के असेल. नंतर एक तासानंतर पावसाची शक्यता 21 टक्के होईल. रात्री 11 वाजता जवळपास 36 टक्के पाऊस पडण्याची शक्यता आहे. या वेळी ताशी 15 ते 20 किमी वेगाने वारे वाहू शकतात आणि आकाश ढगाळ राहील.
हवामानाचा अंदाज पाहता सामना वेळेवर सुरू झाला नाही तर अडचण येऊ शकते, असे म्हणता येईल. आता चाहत्यांना संपूर्ण सामना पाहायला मिळणार की नाही हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. शेवटच्या दोन्ही सामन्यांमध्ये पावसामुळे चाहते नाराज झाले होते आणि त्याच्या आनंदावर विरजण पडले होते.
IND vs SA 3rd T20 : गोलंदाजांकडून मोठ्या अपेक्षा; भारताचा दक्षिण आफ्रिकेशी आज तिसरा टी-20 सामना…
दुसऱ्या सामन्यात टीम इंडियाचा 5 विकेटने पराभव…
गेकेबरहा येथे खेळल्या गेलेल्या दुसऱ्या सामन्यात प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या भारतीय संघाने 19.3 षटकात 7 विकेट गमावत 180 धावा केल्या होत्या आणि त्यानंतर पावसाला सुरुवात झाली. पाऊस थांबल्यानंतर, आफ्रिका फलंदाजीला आली आणि त्यांना DLS नुसार सुधारित लक्ष्य म्हणून 15 षटकांत 152 धावा करायच्या होत्या, जे लक्ष्य त्यांनी केवळ 13.5 षटकांत गाठले.