IND vs SA 3rd ODI : द.आफ्रिकेविरूध्दच्या अखेरच्या सामन्यातही टीम इंडियानं मारली बाजी, मालिकेवरही 3-0 ने निर्विवाद वर्चस्व…

IND vs SA ODI Series 2024 (Women Cricket) : भारतीय महिला क्रिकेट संघाने दक्षिण आफ्रिकेविरूध्दच्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत 3-0 ने निर्भेळ यश संपादन केलं आहे. रविवारी झालेल्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताने 6 गडी राखून विजय मिळवला. तीन सामन्यात 343 धावा करणाऱ्या उपकर्णधार स्मृति मंधाना हिला मालिकावीर म्हणून घोषित करण्यात आले.
दक्षिण आफ्रिकेने भारतासमोर विजयासाठी 216 धावांचे आव्हान ठेवले होते. प्रत्युत्तरात भारताने 40.4 षटकांत 4 विकेट्स गमावून लक्ष्याचा सहज पाठलाग केला. स्टार सलामीवीर स्मृती मंधाना हिने पुन्हा एकदा चमकदार कामगिरी केली. तिचे सलग तिसरे शतक केवळ 10 धावांनी हुकले. तिने 83 चेंडूत 11 चौकारांच्या मदतीने 90 धावांची खेळी केली. याव्यतिरिक्त कर्णधार हरमनप्रीत कौरने 42 धावांची खेळी केली. तर शेफाली वर्माने 25 , प्रिया पुनियाने 28 धावांचे योगदान दिले. तर जेमिमाह रॉड्रिग्स 19 तर रिचा घोष 6 धावांवर नाबाद राहिल्या. रिचाने षटकार ठोकत भारताला विजयाचा उंबरठा ओलांडून दिला.
For her effective bowling and taking two important wickets, Deepti Sharma bagged the Player of the Match award 👏 👏
Scorecard ▶️ https://t.co/Y7KFKaW91Y #TeamIndia | #INDvSA | @Deepti_Sharma06 | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/8ZMdGHOr2l
— BCCI Women (@BCCIWomen) June 23, 2024
तत्पूर्वी, बंगळुरूच्या एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना दक्षिण आफ्रिकेने निर्धारित 50 षटकांत 8 गडी गमावून 215 धावा केल्या होत्या. आफ्रिकन संघातर्फे कर्णधार लॉराने 57 चेंडूंत 7 चौकारांसह 61 धावांची खेळी केली. ताजमीनने लॉरासोबत शतकी भागीदारी रचली. ताजमीनने 38 धावांची खेळी केली. या दोघींशिवाय इतर कोणत्याही फलंदाजाला विशेष काही करता आले नाही. तर भारताकडून अरुंधती रेड्डी आणि दीप्ती शर्मा यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले. तर पूजा वस्त्राकार अन् श्रेयका पाटीलला प्रत्येकी एक यश मिळाले.
मालिकेवर 3-0 ने निर्विवाद वर्चस्व….
भारतीय महिला क्रिकेट संघाने तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका 3-0 अशी जिंकली. पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेचा 143 धावांनी पराभव केला होता, तर दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताला कडवी झुंज द्यावी लागली आणि भारताने तो सामना 4 धावांनी जिंकला. यानंतर भारतीय संघाने शेवटचा एकदिवसीय सामना 6 विकेटने जिंकला.





