IND vs SA 2nd T20 : भारताला दुसरा धक्का, यशस्वीनंतर शुभमन गिलही शून्यावर बाद….

IND vs SA 2nd T20 Live Score : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेतील दुसरा सामना मंगळवारी (12 डिसेंबर) खेळवला जात आहे. रविवारी डर्बनमध्ये पावसामुळे मालिकेतील पहिला सामना रद्द करण्यात आला होता. त्यानंतर उभय संघांमधला दुसरा टी-20 सामना गकेबरहा येथील सेंट जॉर्ज पार्क येथे होत आहे. दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार एडन मार्करमने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे . टीम इंडिया प्रथम फलंदाजी करेल. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेकडून कोणत्याही खेळाडूने पदार्पण केलेले नाही. या सामन्यात रुतुराज गायकवाड खेळत नाहीये. तो आजारी आहे.
दरम्यान, 1.6 व्या षटकात अवघ्या 6 धावांवर भारताला दुसरा व मोठा धक्का बसला. दुसऱ्या ओव्हरच्या शेवटच्या चेंडूवर उजव्या हाताचा वेगवान गोलंदाज लिझाद विल्यम्सने शुभमन गिलला एलबीडब्ल्यू आऊट केले. शुभमनने मैदानावरील पंचांच्या निर्णयाला आव्हान दिले आणि रिव्ह्यू घेतला. चेंडू विकेटला आदळत असल्याचे रिव्ह्यूमध्ये स्पष्टपणे दिसून आले अन् गिलने रिव्ह्यू गमावला. दोन चेंडूंचा सामना केल्यानंतर तो शून्यावर बाद झाला.
2ND T20I. WICKET! 1.6: Shubman Gill 0(2) lbw Lizaad Williams, India 6/2 https://t.co/0sPVekal3m #SAvIND
— BCCI (@BCCI) December 12, 2023
पहिल्याच षटकात भारताला पहिला धक्का बसला. मार्को जॅनसेनने यशस्वी जैस्वालला पॅव्हेलियनमध्ये पाठवले. षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर पॉइंटच्या दिशेने चौकार मारण्याच्या प्रयत्नात यशस्वी झेलबाद झाला. डेव्हिड मिलरने यशस्वी जैस्वालचा अप्रतिम झेल घेतला. तीनन चेंडूंचा सामना केल्यानंतर तो शून्यावर बाद झाला.
IND vs SA Live Score : दोन्ही संघाची प्लेइंग-11
भारत : यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल, टिळक वर्मा, सूर्यकुमार यादव (कर्णधार), रिंकू सिंग, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंग, मुकेश कुमार.
दक्षिण आफ्रिका : मॅथ्यू ब्रिट्झके, रीझा हेंड्रिक्स, एडन मार्कराम (कर्णधार), हेनरिक क्लासेन (यष्टीरक्षक), डेव्हिड मिलर, ट्रिस्टन स्टब्स, मार्को जॅनसेन, अँडिले फेहलुकवायो, जेराल्ड कोएत्झी, लिझाद विल्यम्स, तबरेझ शम्सी.





